मुंबई: अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. यानंतर सर्वजण राणी स्टारर 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. शेवटी ती प्रतीक्षा संपली आहे, कारण यशराज स्टुडिओनं 'मर्दानी 3'ची अधिकृत घोषणा केली आहे. आज 13 डिसेंबर रोजी 'मर्दानी 2'च्या रिलीजला 5 वर्षे पूर्ण झाले आहेत. या प्रसंगी निर्मात्यांनी 'मर्दानी 3'च्या रिलीज तारीख घोषित केली आहे. आता ही बातमी राणीच्या चाहत्यांसाठी एका मेजवाणीप्रमाणे आहे. 2024मध्ये मर्दानी रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. ही फ्रँचायझी 2014 मध्ये सुरू झाली होती. यामध्ये अनेकांना राणीचा अभिनय आवडला होता.
'मर्दानी 3' कधी प्रदर्शित होणार? : दरम्यान 'मर्दानी' हा चित्रपट 22 ऑगस्ट 2014 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान 'मर्दानी 3'मधील यशराज स्टुडिओनं नवीन पोस्टर शेअर करून रिलीज डेट जाहीर केल्यानंतर अनेकजण या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण हा चित्रपट पहिल्या दिवशी पाहणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.'मर्दानी 3'ची निर्मिती आदित्य चोप्रा करत असून याला अभिराज मीनावाला डायरेक्ट करणार आहे. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटामधील बाकीची स्टारकास्ट समोर आलेली नाही.
'मर्दानी 3' चित्रपटात नवीन काय असेल : राणी मुखर्जीच्या दोन्ही चित्रपटांची कहाणी उत्कृष्ट होती. 'मर्दानी' आणि 'मर्दानी 2'चं दिग्दर्शन उत्कृष्ट होतं.'मर्दानी 3'बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटामध्ये राणी अॅक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान यशराज फिल्मनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, 'प्रतीक्षा संपली! 'मर्दानी 3'मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा उग्र शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत आली आहे. 2026मध्ये सिनेमागृहात.' दरम्यान राणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटासाठी राणीला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
हेही वाचा :
- 'कुछ कुछ होता है'साठी करणची पहिली पसंत कोण ?, अमनची भूमिका साकारून सलमाननं स्वतःला म्हटलं वेड ...
- आयफा अवॉर्ड्स 2024 : शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - IIFA 2024 Winners Full List
- राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी'ला 10 वर्ष पूर्ण, निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची केली घोषणा - 10 Years of Mardaani