मुंबई - Raghav Juyal: होस्ट आणि अभिनेता राघव जुयाल आणि कृतिका कामरा यांची आगामी वेब सीरीज 'ग्यारह ग्यारह' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या वेब सीरीजमध्ये राघव जुयाल हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अलीकडेच राघव जुयालनं या सीरीजमधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यानं म्हटलं, "हे पात्र माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण मला त्याच्या भूतकाळाचा आणि दु:खाचा विचार करावा लागत होता. मी ही भूमिका नकारात्मक विचारांनी केलेली नाही."
'ग्यारह ग्यारह' वेब सीरीजबद्दल राघव जुयालनं केला अनुभव शेअर : यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "माझ्या पात्रात कोणतीही चूक नाही. त्याच्या वडिलांनी त्याला जे काही शिकवलं होतं तो ते करत होता. त्याला आपला व्यवसाय वाढवायचा होता. त्यामुळे माझ्यासाठी तो खलनायक नव्हता. मी खलनायक आहे असं मला वाटलं नाही. मला स्वत:ला खलानायकाची मानसिकता जपण्यासाठी 6 दिवस एका खोलीत कोंडून राहावं लागलं असतं, ही एक टेक्निक्स आहे. त्यामुळे माझे पात्र खूपच सुंदर आहे." यानंतर त्याच्या डायलॉगबद्दल चर्चा करताना राघवनं म्हटलं, "वेब सीरीजमधील मी कोणते डायलॉग बोलले आहेत तेही स्पष्ट नाही. मला हिंदीही नीट येत नाही. मी सीरीज जे काही हिंदी आणि उर्दू शब्द बोललो ते मी खूप वेगानं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना आवडेल की नाही माहीत नाही. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे."
'ग्यारह ग्यारह' वेब सीरीजबद्दल : यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "मी एक बॅक डान्सर बनण्यासाठी आलो. हे सगळे बोनस चालू आहेत. मी अनेक कार्यक्रमात डान्स केला आहे, कोरिओग्राफ केली, कोणीतरी होस्टिंगसाठी विचारले, होस्टिंग देखील केली. मी 14-15 वर्षे सर्वकाही प्रयत्न केले. हे सर्व करताना मजा येत आहे." बुधवारी 24 जुलै रोजी निर्मात्यांनी 'ग्यारह ग्यारह'चा ट्रेलर रिलीज केला होता. या वेब सीरीजची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर आणि गुनीत मोंगा कपूर यांनी केली आहे. ही वेब सीरीज 9 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5वर प्रसारित होईल. आता राघवचे अनेक चाहते त्याच्या वेब सीरीजच्या प्रतीक्षेत आहेत.