ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'च्या निर्मात्यानं शेअर केलं नवीन पोस्टर, पाहा अल्लू अर्जुनचा दमदार लूक - pushpa 2 - PUSHPA 2

Pushpa 2 : 'पुष्पा 2: द रुल'मधील 'पुष्पा-पुष्पा' गाणं रिलीज होण्यापूर्वी एक नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त लूक दिसत आहे.

Pushpa 2
पुष्पा 2
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 2:57 PM IST

मुंबई - Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' मधील पहिलं गाणं 'पुष्पा-पुष्पा' आज 1 मे रोजी संध्याकाळी प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्मात्यांनी 30 एप्रिलच्या संध्याकाळी 'पुष्पा-पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनचं पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली होती. याआधी हे गाणं आज सकाळी 11 वाजता रिलीज होणार होतं आणि लगेचच निर्मात्यांनी त्याची वेळ बदलली. आज, 1 मे रोजी, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचं आणखी एक आकर्षक पोस्टर शेअर केलं आहे. मैत्री मूव्ही मेकर्स आणि अल्लू अर्जुन यांनी स्वतः 'पुष्पा-पुष्पा' गाण्यामधील नवीन दमदार पोस्टर शेअर केल्यानंतर अनेकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याची प्रतिक्रिया पोस्टमध्ये करताना दिसत आहेत.

'पुष्पा 2: द रुल'मधील पोस्टर : या पोस्टरमध्ये अल्लू हा कारसमोर उभा असल्याचं दिसत आहे. त्यानं काळ्या पॅन्टसह गडद गुलाबी रंगाचा नक्षीदार शर्ट घातला आहे. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी यावर लिहिलं, "भारताचा मास सेंसेशन पुष्पा राज इथे आहे. चला आज 'पुष्पा-पुष्पा' या ब्लॉकबस्टर गाण्याचं स्वागत करूया, 'पुष्पा 2'चा फर्स्ट सिंगल आज संध्याकाळी 5.04 वाजता तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगालीमध्ये रिलीज होईल. 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे." आता या चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत.

'पुष्पा 2: द रुल' स्टार कास्ट : पहिल्यांदाच साऊथमधील गाणं बंगाली भाषेतही रिलीज होणार आहे. हा पॅन इंडिया चित्रपट बंगालीतही प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदान्ना, फहाद फाजिल, विजय सेतुपती, प्रियामणी, श्रीतेज, अनसुया भारद्वाज, दिवी वध्या, जगपती बाबू, प्रकाश राज, राव रमेश, सुनील आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'पुष्पा 2'बरोबर बॉलिवूडमधील रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा देखील चित्रपट रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर चांगलीच टक्कर पाहायला मिळेल. आता सध्या 'पुष्पा 2'ची क्रेझ चाहत्यांमध्ये अधिक आहे, त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर नक्की ठरले असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल केला लारा दत्तानं खुलासा, वाचा सविस्तर - lara breaks silence on kaikeyi role
  2. सुनील शेट्टी लवकरच एका थ्रिलर चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसेल, दमदार लूक झाला व्हायरल - Sunil Shetty
  3. टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं नागा चैतन्यनं केलं कबुल, व्हिडिओ व्हायरल - naga chaitanya

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.