मुंबई : बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पुष्पा 2'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेला नाही, तर प्रीपेन करण्यात आला आहे. हा चित्रपट आधी 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट 6 डिसेंबरपूर्वी प्रदर्शित होणार आहे. आज, 'पुष्पा 2'च्या नवीन रिलीज तारखेचा निर्णय हैदराबादमध्ये केला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ग्रँड नॅशनल प्रेस मीट घेतली होती. यामध्ये या चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2' चित्रपट कधी प्रदर्शित होईल, आता हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'पुष्पा 2' कधी प्रदर्शित होणार? : 'पुष्पा 2'चे निर्माते, मैत्री मुव्हीज मेकर्स यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर 'पुष्पा 2'ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. 'पुष्पा 2' ची नवीन रिलीज डेट जाहीर होताच, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहेत. दरम्यान 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी ही बातमी शेअर करताना लिहिलंय, 'आता एक दिवस आधी सेलिब्रेशन सुरू होईल, एक दिवस आधीच बॉक्स ऑफिसवर विक्रम होईल. एक दिवस अगोदरच बनवलेला, पुष्पराज एक दिवस अगोदर येतोय, होय, सर्वात मोठा भारतीय चित्रपट 'पुष्पा 2' आता 5 डिसेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे.'
'पुष्पा 2'चे शूटिंग : 'पुष्पा 2'चे दिग्दर्शक सुकुमार यांनी अलीकडेच 'ॲनिमल' फेम कलाकार सौरभ सचदेवा, फहद फासिल आणि ब्रह्माबरोबर 'पुष्पा 2' चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले. या शेड्यूलवरून हे निश्चित झाले की, 'ॲनिमल' फेम अभिनेता सौरभ सचदेवा नक्कीच 'पुष्पा 2' चित्रपटात प्रवेश करेल. 'पुष्पा 2'चे उर्वरित शूटिंग नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. दरम्यान विक्की कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट 6 डिसेंबरला बॉक्स रिलीज होणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर बहुचर्चित 'पुष्पा 2' आणि 'छावा'चा संघर्ष हा पहिल्या दिवसापासून होणार नाही. 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट एक दिवस आधी प्रदर्शित होत असल्यान आता अनेक चाहते खुश आहेत.
हेही वाचा :
- 'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' स्टारनं केली एन्ट्री, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात होईल धमाका
- 'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर पाहिल्यावर चाहते झाले उत्साहित, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 teaser
- अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा-2'मधील 'अंगारों' गाण्यावर दोन चिमुकल्यांनी केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2