मुंबई - Shah Rukh Khan Fan Meet : सुपरस्टार शाहरुख खानने 2023 मध्ये त्याच्या पठाण, जवान आणि डंकी या सुपरहिट चित्रपटांच्या यशाने पडद्यावर मोठ्या प्रमाणावर पुनरागमन केले. गेली चार वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर गेलेला शाहरुखच्या पुनरागमनाला त्याच्या भारतातील आणि बाहेरील चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटांना मिळालेल्या यशाच्या हॅट्ट्रिकने सिद्ध केलंय की, किंग खान हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी बनला आहे आणि त्याने प्रेक्षकांशी आपले अतुट नाते जपले आहे.
-
SRK expresses gratitude to the audience for showering love upon him in 2023 ❤️#Dunki #Jawan #Pathaanpic.twitter.com/rxciNkVY6X
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">SRK expresses gratitude to the audience for showering love upon him in 2023 ❤️#Dunki #Jawan #Pathaanpic.twitter.com/rxciNkVY6X
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024SRK expresses gratitude to the audience for showering love upon him in 2023 ❤️#Dunki #Jawan #Pathaanpic.twitter.com/rxciNkVY6X
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024
अलिकडेच तो डंकी चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांशी संवाद साधत होता. यावेळी त्यानं आपल्या पुनरागमनाच्या प्रवासावर भाष्य केलं. 2023 वर्षाची सुरुवात त्याच्या यशस्वी पठाण आणि त्या पाठोपाठ जवान या चित्रपटासह केली. त्यापूर्वी गेली 33 वर्षे कलेची सेवा करत आलेल्या शाहरुखला चार वर्षे या क्षेत्रापासून दूर राहावे लागले होते. इतका मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय हा एक अभिनव अनुभव होता, याची कबुली 58 वर्षीय शाहरुखने यावेळी दिली.
-
King Khan arrives at YRF studios for #Dunki meet and greet event ❤️ @iamsrk
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
pic.twitter.com/papy0ofwp0
">King Khan arrives at YRF studios for #Dunki meet and greet event ❤️ @iamsrk
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024
pic.twitter.com/papy0ofwp0King Khan arrives at YRF studios for #Dunki meet and greet event ❤️ @iamsrk
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 29, 2024
pic.twitter.com/papy0ofwp0
आपल्या प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, शाहरुख खानने पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटांना मिळालेल्या अफाट प्रेमाची आणि स्वीकाराची कबुली दिली. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाने शाहरुख भारावून गेला होता. त्याच्या कलात्मक प्रवासाला पुन्हा एकदा आकार देण्यासाठी तो दीर्घकाळ प्रेक्षकांपसून बाजूला गेला होता.
"या संपूर्ण देशाने आणि भारताबाहेरील प्रेक्षकांनी मला चित्रपटांपेक्षा जास्त त्यांच्या हृदयात जागा दिली आहे. त्यांना अधिक काळ मी सुट्टीवर आवडले नव्हते. त्यामुळे मी मी जे करतो ते योग्य आहे आणि मी ते करत राहायला हवे याची जाणीव करून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे, प्रेक्षकांचे आणि संपूर्ण जगाचा खूप आभारी आहे," असे शाहरुख सोमवारी कार्यक्रमात म्हणाला.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा 'डॉंकी फ्लाइट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्राच्या पार्श्वभूमीवर मातृभूमीची ओढ दाखवणारा आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही, हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खोलवर रुजला आणि सर्व थरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
हेही वाचा -