ETV Bharat / entertainment

पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी अपात्र घोषित झाल्यानंतर विनेश फोगटला मिळाली स्टार्सची साथ - Vinesh Phogat - VINESH PHOGAT

Vinesh Phogat: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र घोषित करण्यात आलं. या बातमीनंतर विनेशनं आज सकाळी निवृत्ती जाहीर केली. या कठिण काळात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सारा अली खान यांनी दु:ख व्यक्त केलंय.

Vinesh Phogat
विनेश फोगट ((Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 2:29 PM IST

मुंबई - Vinesh Phogat : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सारा अली खान यांनी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधून भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर नोट शेअर केल्या आहेत. याआधी आलिया भट्ट, रणवीर सिंग, स्वरा भास्कर, करीना कपूर खान, मलायका अरोरा, तापसी पन्नू यांच्यासह अनेक कलाकारांनी विनेशला पाठिंबा दिला होता.

अनुष्का शर्मा आणि सारा अली खान यांची प्रतिक्रिया : विनेश फोगटच्या अपात्रतेनं आणि निवृत्तीच्या घोषणेनं अनुष्का शर्माला दु:ख झालंय. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर विनेशसाठी एक विशेष नोट शेअर केली आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्ही सर्व दुःखी आहोत, मी कल्पनाही करू शकत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल. तुम्ही खरे चॅम्पियन आहात." सारा अली खानही विनेशच्या पाठिंबा देत तिनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप्शनमध्ये विनेशसाठी लिहिलं आहे, "तू आपल्या सर्वांसाठी खरी चॅम्पियन आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे."

करण जोहर : चित्रपट निर्माता करण जोहरनं विनेश फोगटसाठी एक खूप खास संदेश दिला आहे. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्यासाठी लिहिलं, "विनेश फोगटनं तिचं नाव इतिहासात नोंदवलं आहे. तिची चिकाटी, तिची ताकद आणि अजिंक्यतेची भावना हे तिचं पदक आणि सोने आहे. लीजेंड पीरियड." अनिल कपूर, सुनील शेट्टी, वरुण धवन, सोनू सूद यांच्यासह अनेक स्टार्सनी विनेश फोगटचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

विनेशनं केली निवृत्ती जाहीर : पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटनं गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी पहाटे कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तिनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर निवृत्तीची घोषणा करताना एक भावनिक संदेश पोस्ट केला. त्यात तिनं लिहिलं, "आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले आहेत, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, क्षमस्व."

ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटचा सामना : महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या पहिल्या फेरीत विनेशनं 10 सेकंदांनी पुनरागमन करत चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव केला. यानंतर तिनं उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा हरवलं. याशिवाय तिनं उपांत्य फेरीत युस्नेलिस गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. पॅरिस ऑलिम्पिक तिचा प्रवास हा कठिण होता, मात्र प्रत्येक भारतीयाला तिच्यावर अभिमान आहे.

हेही वाचा :

  1. विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरल्यानंतर कंगना रणौत आणि नयनताराची प्रतिक्रिया - VINESH PHOGAT
  2. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाहबंधनात अडकणार? - Naga Chaitanya
  3. विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र, सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया - Vinesh Phogat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.