ETV Bharat / entertainment

'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्री हेमल इंगळेनं बॉयफ्रेंडला केलं 'एक्स'; साखरपुड्याचे फोटो व्हायरल - hemal ingale - HEMAL INGALE

Hemal Ingle Engagement: 'नवरा माझा नवसाचा 2'मधील मुख्य अभिनेत्री हेमल इंगळेनं आपल्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केला आहे. तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. आता अनेकजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Hemal Ingle Engagement
हेमल इंगळेचा साखरपुडा (Hemal Ingle - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 3:30 PM IST

मुंबई - Hemal Ingle Engagement: 'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्री हेमल इंगळे आता चर्चेत आली आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हेमलनं नुकताच तिच्या साखरपुड्यामधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या होणार पतीबरोबर खूप खुश असल्याची दिसत आहे. हेमलच्या पतीचं नाव रोनक आहे. साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "एक्स बॉयफ्रेंड, फक्त गोंधळ टाळण्यासाठी एक्स बॉयफ्रेंड कारण मी त्याला आता माझा होणारा पती म्हणू शकते." यासह तिनं लाल हार्ट इमोजी शेअर केला आहे. आता तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला शुभेच्छा देत आहेत. तिनं शेअर केलेला हा फोटो अनेकांना आवडत आहेत.

हेमल इंगळेनं बॉयफ्रेंडबरोबर केला साखरपुडा : 'अशी ही आशिकी' या चित्रपटामुळे हेमल इंगळे प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटात तिनं अभिनय बेर्डेबरोबर काम केलं होतं. सध्या हेमल तिच्या आगामी 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी , सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले आणि निवेदिता सराफ हे कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत.

हेमल इंगळेला दिल्या 'या' कलाकरांनी शुभेच्छा : हेमलनं शेअर केलेल्या फोटोच्या कमेंट्स विभागात अभिनेत्री रिंकू राजगुरू, श्रिया पिळगावकर, फुलवा खामकर, सौरभ चौघुले, मुग्धा चाफेकर, रसिका सुनील, रुचिरा सावंत, पल्लवी कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान हेमलबद्दल बोलायचं झालं तर तिनं पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत 'मिस अर्थ इंडिया' हा किताब जिंकला होता. हेमलनं 'आस'मधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. आता ती आगामी चित्रपट 'नवरा माझा नवसाचा 2'च्या रिलीजसाठी खूप उत्सुक आहे. तिला पहिल्यांदाच दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. 'नवरा माझा नवसाचा 2'चं सचिन पिळगावकर यांनी शेअर केलं पहिलं पोस्टर, चित्रपट कधी होईल रिलीज जाणून घ्या - sachin pilgaonkar
  2. सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटिंग झालं सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.