मुंबई - Murder Mubarak Teaser OUT : होमी अदजानिया यांच्या मल्टीस्टारर चित्रपट 'मर्डर मुबारक'चा टीझर आज 5 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर, टिस्का चोप्रा,सुनील नय्यर, संजय कपूर आणि विजय वर्मा यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. 'मर्डर मुबारक'मधील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक देखील रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 15 मार्च रोजी रिलीज होणार आहे. 'मर्डर मुबारक' हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. या चित्रपटातून करिश्मा कपूर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा पंकज त्रिपाठी आणि करिश्माचे चाहते करत आहेत.
'मर्डर मुबारक'चा टीझर रिलीज : 'मर्डर मुबारक' या चित्रपटाचा टीझर अनेकांना आवडल्याचं प्रतिक्रियावरुन दिसतंय. बीइंग सायरस, कॉकटेल आणि इंग्लिश मीडियम यांसारख्या जबरदस्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक होमी अदजनिया हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी वेगळ्या अंदाजमध्ये रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, त्यामुळे अनेकजण खूश आहेत. या चित्रपटाची कहाणी ही लेखिका अनुजा चौहानच्या बुक 'क्लब यू टू डेथ'मधून प्रेरित आहे.
सारा अली खान आणि पंकज त्रिपाठी वर्कफ्रंट : सारा अली खान आणि पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, सारा 'लुका चुप्पी 2' आणि 'ऐ वतन मेरे वतन'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'मेट्रो इन दिनो'मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलंय. सारा आणि आदित्य व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फझल आणि फातिमा सना शेख हे कलाकार दिसणार आहेत. दुसरीकडे पंकज त्रिपाठी हा 'मैं अटल हूं 'मध्ये दिसला. तो 'ठग लाइफ' आणि 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या आगामी चित्रपटामध्येही दिसणार आहे.
हेही वाचा :