ETV Bharat / entertainment

'मिर्झापूर सीझन 3'चं पोस्टर आणि टीझर झालं रिलीज - Mirzapur Season 3 - MIRZAPUR SEASON 3

Mirzapur Season 3 teaser out : बहुप्रतीक्षित वेब सीरीज 'मिर्झापूर सीझन 3'चं पोस्टर आणि रिलीज तारीख आज 11 जून रोजी शेअर करण्यात आली आहे. याशिवाय या वेब सीरीजचं टीझर देखील प्रदर्शित करण्यात आलंय.

Mirzapur Season 3 teaser out
मिर्झापूर सीझन 3 टीझर आउट ('मिर्जापुर सीजन 3' (IMAGE - IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Mirzapur Season 3 teaser out : बहुचर्चित वेब सीरीज मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'मिर्झापूर' आणि 'मिर्झापूर 2'च्या धमाक्यानंतर आता 'मिर्झापूर सीझन 3' देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या क्राईम थ्रिलर सीरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज तारीख आज 11 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. प्राइम व्हिडिओवर 'मिर्झापूर सीझन 3' कधी रिलीज होईल याबद्दल सांगण्यात आलं आहे. 'मिर्झापूर सीझन 3' 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा आणि हर्षिता गौर स्टारर 'मिर्झापूर 3' पुन्हा एकदा आता चर्चेत आहे.

'मिर्झापूर 3'चा टीझर रिलीज : 'मिर्झापूर 3'मध्ये नवीन चेहरे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. एक्सेल एंटरटेनमेंट 2022 पासून 'मिर्झापूर 3'वर काम करत आहे. 'मिर्झापूर 3 'च्या निर्मात्यांनी सोशल मीडिया टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये काही नवीन चेहरे दिसत आहे. याशिवाय टीझरमध्ये थरारक सीन पाहायला मिळत आहे. टीझर पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिलं, "जंगल में भौकाल मचने वाला है! 'मिर्झापूर 3' प्राईमवर, 5 जुलाई." मिर्झापूर 3' मध्येही नवे चेहरे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 'मिर्झापूर 3' वेब सीरीज यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही.

'मिर्झापूर सीझन 3' मध्ये काय दिसणार? : या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू असणार आहे. आता ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. 'मिर्झापूर 2' अतिशय नाट्यमय पद्धतीनं संपला. 'मिर्झापूर 3' मध्ये त्या सर्व घटना सुरू ठेवल्या जातील. यामध्ये गुड्डू भैय्या (अली फजल) च्या हातून मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) च्या मृत्यूनंतर, कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांनी शरदबरोबर युती केली. आता पुढची काही 'मिर्झापूर सीझन 3' चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. 'मिर्झापूर सीझन 3'मध्ये धमाका होताना दिसणार आहे. आता अनेकज शेअर झालेल्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. "रजनीकांत ही इश्वरानं मानवाला दिलेली भेट", अनुपम खेरचा रजनीकांतबरोबर मजेशीर व्हिडिओ - Rajanikanth
  2. बिग बॉस OTT 3 में आ रही 'तिरछी टोपी वाले' फेम एक्ट्रेस, 24 साल बाद पर्दे पर लौटेगी ये हसीना - Sonam Khan Bigg Boss OTT 3
  3. बिग बींचा 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर पाहून अभिषेक बच्चननं म्हटलं 'माइंडब्लोइंग' - KALKI 2898 AD TRAILER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.