मुंबई Malaika Arora Father Suicide Case: अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी तिची आई जॉयस पॉलीकार्प यांचा जबाब नोंदवला. 11 सप्टेंबर रोजी छतावरुन पडून मेहता यांचा मृत्यू झाला. यानंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेहता (६२) यांनी बुधवारी सकाळी वांद्रे (पश्चिम) येथील 'आयशा मनोर' नावाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी आणि मलायकाची आई जॉयस या फ्लॅटमध्ये उपस्थित होत्या.
मलायकाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला : यानंतर पुढं सांगण्यात आलं की, मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा व्यतिरिक्त पोलीस एक-दोन दिवसांत चौकीदार आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांचे जबाबही नोंदवतील. प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टनुसार अनिल मेहता यांचा मृत्यू डोक्याला आणि इतर अवयवांना झालेल्या जखमांमुळे झाला आहे. पोलिसांनी याबद्दलची माहिती गुरुवारी दिली. अनिल मेहता यांनी बुधवारी सकाळी वांद्रे येथील भागात असलेल्या 'आयशा मनोर' इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर तेथील काही नजीकचा परिसर हा सील केला आहे. अनिल हे आपल्या पत्नीसह तिथं राहत होते.
याप्रकरणी पोलिसांनी काय सांगितलं ? : दरम्यान, ज्या दिवशी अनिल मेहतांचा यांचा मृत्यू झाला, त्याच सायंकाळी शासकीय रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "अनिल मेहता यांचं शरीर हे रक्तानं माखलेलं होते आणि इमारतीच्या आवारात रक्त पडलेलं होतं." दरम्यान कुटुंबीयांचे आणि साक्षीदारांचे जबाब पोलीस नोंदवत असल्याचं देखील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे. आता अभिनेता वरुण धवन आणि विजय वर्मा यांनी मलायका आणि तिच्या प्रायव्हसीबाबत मीडियाला विनंती केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पापाराझी प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करून लोकांपर्यंत बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही गोष्ट स्टार्सला योग्य वाटली नाही, त्यामुळे मलायकाचे चाहते देखील मीडियाला याप्रकरणी दूर राहण्याची विनंती करत आहेत.
हेही वाचा :