ETV Bharat / entertainment

मलायका अरोरा आणि करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - मलायका अरोरानं शेअर केले फोटो

Amrita Arora Birthday : मलायका अरोराची धाकटी बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज 43वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायकानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

Amrita Arora Birthday
अमृता अरोराचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 1:09 PM IST

मुंबई - Amrita Arora Birthday : अभिनेत्री मलायका अरोराची धाकटी बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा आज 31 जानेवारीला तिचा 43वा वाढदिवस साजरा करतेय. दरम्यान मलायकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमृता अरोरासोबत मलायका अरोरा, करीना कपूर आणि करिश्मा या अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. अमृतानं बेबोला करीनाला घट्ट मिठी मारून कॅमेरासमोर पोझ दिली आहे. याशिवाय या वाढदिवसाचे सेलिब्रेशन हे विशेष बनविण्यासाठी सर्वांनी टोपी घातलेली आहे. या पार्टीसाठी सर्वांनी काळा ड्रेस कोड निवडला आहे.

करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या : अभिनेत्री करीना कपूरनं देखील इंस्टाग्रामवर अमृता अरोरासोबतच्या थ्रोबॅक फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केला आहेत. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''आमच्या मनातील राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे तुझ्यावर सदैव प्रेम आहे. कायम आनंदी राहा अमू.'' या व्हिडिओच्या माध्यमातून करिनानं अमृतासोबतच्या तिच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. करीना कपूर आणि अमृता अरोरामध्ये खूप घट्ट मैत्री आहे. अमृतानं 'आवारा पागल दीवाना'(2002), गोलमाल रिटर्न्स (2009) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला चित्रपटसृष्टीत फार यश मिळू शकलं नाही. अमृता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मलायका अरोराबद्दल : याशिवाय अमृताची मोठी बहीण मलायका अरोरा गेल्या काही वर्षांपासून 'नच बलिये', 'इंडियाज बेस्ट डान्सर', 'जरा नचके देखा' आणि 'झलक दिखला जा' या काही डान्स शोची जज आहे. ती 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'सुपरमॉडेल ऑफ द इयर' सारख्या शोजमध्ये देखील जज म्हणून दिसली आहे. याशिवाय मलायका अरोरा योग स्टुडिओ आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म देखील चालवते. मलायका अरोरानं चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ती अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दल खूप चर्चेत असते.

हेही वाचा :

  1. धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली
  2. 'फायटर'साठी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने घेतली मोठी रक्कम
  3. जंगी स्वागतानंतर घरी परतलेल्या मुनावर फारुकीच्या मुलांनं केलं बाबाचं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.