ETV Bharat / entertainment

मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अरबाज खान पत्नी शूराबरोबर पोहोचला, व्हिडिओ व्हायरल - Malaika Arora - MALAIKA ARORA

Malaika Arora Father Funeral : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत. मलायका तिची आई जॉयस पॉलीकार्प आणि मुलगा अरहान खान हे अंत्यविधीसाठी जाताना दिसले. याशिवाय अरबाज खान पत्नी शूराबरोबर अंत्यदर्शनासाठी जाताना स्पॉट झाला आहे.

Malaika Arora Father Funera
मलायका अरोराच्या वडिलांचे अंत्यसंस्कार (मलायका अरोरा (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 12, 2024, 2:15 PM IST

मुंबई - Malaika Arora Father Funeral : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कथितरीत्या उडी मारुन आत्महत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर मलायकाच्या घरी अनेक चित्रपटसृष्टीतील स्टार्स तिचं सांत्वन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान अनिल मेहता यांच्यावर आज 12 सप्टेंबर रोजी सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मलायका अरोरा ही आई जॉयस पॉलीकार्प आणि मुलगा अरहान खानसह तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरातून निघाली. अरोरा कुटुंबाचं घर सोडतानाचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पापाराझींनी मलायकाच्या घरातील अरोरा कुटुंबाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

मलायका अरोरा आई जॉयस पॉलीकार्प झाली स्पॉट : या व्हिडिओमध्ये मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प या खूप रडताना दिसल्या. या कठीण काळात त्यांचा नातू अरहान त्यांना आधार देत गाडीपर्यंत घेऊन जाताना दिसला. मलायकानं मीडियापासून तिचे अश्रू लपवण्यासाठी काळा सनग्लास लावला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मलायकाची बहीण-अभिनेत्री अमृता अरोरा तिच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. या क्लिपमध्ये अमृता ही तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाबरोबर जाताना दिसत आहे.

मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सेलेब्स पोहोचले : मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान पापाराझींनी मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता अरबाज खानला कॅमेऱ्यात कैद केलं. अरबाजबरोबर त्याची दुसरी पत्नी शूरा खानही यावेळी स्पॉट झाली. याशिवाय मलायकाचा कथित एक्स बॉयफ्रेंड-अभिनेता अर्जुन कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर,शिबानी दांडेकर, सोहेल खान, प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईस, गीता कपूर, गौहर खान, अर्शद वारसी, नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांच्यासह अनेक स्टार्सनी अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली आहे. अरोर कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. त्यामुळे आता अनेकजण मलायचं सांत्वन करताना, तिला धीर देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. अनिल मेहता यांनी मलायका आणि अमृता अरोरा यांना मृत्यूपूर्वी काय म्हटलं, घ्या जाणून - ANIL MEHTA
  2. सोन्यासारख्या दोन मुली असताना केली आत्महत्या, मलायका आणि अमृताचे वडील अनिल मेहता यांनी जीवन संपवलं - ANIL ARORA
  3. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठिशी खंबीर - arjun kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.