ETV Bharat / entertainment

अरिजित सिंगनं दुबईतील कॉन्सर्टमध्ये माहिरा खानचं केलं कौतुक, व्हिडिओ व्हायरल - arijit singh and MAHIRA KHAN - ARIJIT SINGH AND MAHIRA KHAN

Mahira Khan praised Arijit Singh : माहिरा खाननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरिजित सिंग माहिराचे कौतुक करताना दिसत आहे.

Mahira Khan praised Arijit Singh
माहिरा खाननं केलं अरिजित सिंगचं कौतुक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 5:30 PM IST

मुंबई - Mahira Khan praised Arijit Singh : गायक अरिजित सिंगचा नुकताच दुबईत झालेला कॉन्सर्ट विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरिजित प्रेक्षकांमध्ये बसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला ओळखलं नसल्यानं तिची माफी मागताना दिसत आहे. यानंतर माहिरानं अरजितचं कौतुक केलंय. आज, 29 एप्रिल रोजी माहिरानं तिच्या इंस्टाग्रामवर अरिजित सिंगच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं एक सुंदर नोट लिहिलं आहे.

माहिरा खाननं शेअर केला अरिजित सिंगचा व्हिडिओ : या नोटमध्ये तिनं लिहिलं, "एखाद्या कलाकाराला परफॉर्म करताना पाहणे किती आनंददायी असते. प्रेमाने वेढलेले, आनंदात फिरणारे. पण त्याहूनही अधिक, एखाद्या कलाकारामध्ये नम्रता दिसली की बरे वाटते, कारण त्याला माहित आहे की तो हा नाही. तो फक्त वरून आशीर्वादित आहे. सुखी राहा अरजित वाह!" रविवारी एका व्हायरल व्हिडिओमध्ये चाहत्यांना संबोधित करताना गायक अरिजित सिंगनं म्हटलं, "तुम्ही लोक आश्चर्यचकित होणार, हे सांगणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या समोर माहिरा खान बसली आहे, मी तिचे 'जालिमा' गाणं म्हणत होतो आणि ती देखील तेच गाणं उभी होऊन गात होती. मी तिला ओळखू शकलो नाही. मला माफ करा मॅडम, बहुत-बहुत धन्यवाद."

चाहत्यांनी केलं अरजितचं कौतुक : दरम्यान माहिरानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून अरिजितवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. एका चाहत्यानं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, "गायकांमधून सर्वात नम्र व्यक्ती हा अरजित आहे, मला तो खूप आवडतो." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अरजित हा चांगला गायक तर आहे आणि चांगला व्यक्ती देखील आहे." आणखी एकानं लिहिल, "अरजितनं खूप सुंदर ओळख करून दिली, मला दोघेही खूप आवडतात." याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान माहिरानं शाहरुख खानबरोबर 'रईस 'चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती.

हेही वाचा :

  1. 'पिकू'च्या सेटवर इरफानला पाहून घाबरली होती दीपिका पदुकोण, 'राणा'बरोबरच्या आवडत्या क्षणांना दिला उजाळा - IRRFAN KHNA DEATH ANNIVERSARY
  2. ज्युनियर एनटीआर मुंबईत! हृतिक - सबा, रणबीर - आलिया बरोबर केली डिनर डेट - Ranbir Alia to Jr NTR Dinner Date
  3. प्रियांका चोप्रानं जोनास, मुलगी मालती मेरीसह घेतला सुट्टीचा आनंद, शेअर सुंदर झलक - Priyanka Chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.