ETV Bharat / entertainment

'सिस्टर्स डे' असताना क्रिती सेनॉननं नुपूरबरोबर साजरा केला 'फ्रेंडशिप डे', बहिणीबाबत व्यक्त केल्या भावना - friendship day 2024 - FRIENDSHIP DAY 2024

Kriti sanon News: जगभरात आज 'मैत्री दिन' आणि 'बहीण दिन' साजरा होत असताना अभिनेत्री क्रिती सेनॉन सेलिब्रिटी 4 ऑगस्ट हा दिवस सर्वांसाठी विशेष आहे. या दिवशी अनेकजण आपल्या मित्रांबरोबर पार्टी करून नाही तर बाहेर जाऊन 'फ्रेंडशिप डे' साजरा करतात. क्रिती सेनॉननंदेखील हा खास दिवस आपल्या बहिणीबरोबर साजरा केला आहे.

Kriti sanon
क्रिती सेनॉन (Kriti sanon - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 7:17 PM IST

मुंबई -Kriti sanon: जगभरात आज 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉननं हा खास दिवस, तिची बेस्ट फ्रेंड असलेली बहीण नुपूर सेनॉनबरोबर साजरा केला आहे. क्रिती सेनॉननं बहीण नुपूरबरोबर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. क्रिती सेनॉननं अनेकदा तिची ही बहीण चांगली मैत्रीण असल्याचं सांगते.

क्रितीची आणि नुपूरची बाँडिंग खूप खास आहे. बहीण असल्यावर तिला बाहेरच्या मित्राची गरज वाटत नाही. आता क्रिती सेनॉननं शेअर केले खास फोटो अनेकांना आवडत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून दोघींचं कौतुक करताना दिसत आहेत.

क्रिती सेनॉननं बहिणीबरोबर केला 'फ्रेंडशिप डे' साजरा : क्रिती सेनॉननं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बहिणीबरोबर 'फ्रेंडशिप डे' साजरा करत आहे. या पोस्टवर तिनं लिहिलं की, "जेव्हा मी तुझ्याबरोबर असते, तेव्हा मला अधिक छान वाटते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास मैत्रीण. सर्वांना 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा." 28 वर्षांची नुपूर सेनॉन क्रितीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. क्रिती सेनॉन आणि नुपूर सेनॉन या सख्या बहिणी आहेत. तशाच चांगल्या मैत्रिणीही आहेत. क्रिती ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती जवळपास 10 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. क्रितीनं 'हिरोपंती', 'बरेली की बर्फी', 'राबता' 'मिमी' आणि 'तेरी बातों में उलझा जिया' यासारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय.

क्रिती सेनॉनचं वर्कफ्रंट : क्रिती आणि नुपूर नेहमी एकत्र हँगआउट करतात. अनेकदा दोघेही बाहेर किंवा पार्टीमध्ये जाताना दिसतात. दरम्यान 'फ्रेंडशिप डे' ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. प्रत्येकजण हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आपल्या जिवलग मित्रांना टाईम देतात. दरम्यान क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी कॉमेडी-ड्रामा 'क्रू'मध्ये दिसली होती. यामध्ये तिच्याबरोबर तब्बू, करिना कपूर खान, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे कलाकार होते. आता पुढं ती ' हाऊसफुल्ल 5'मध्ये अक्षय कुमारबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय ती 'दो पत्ती'मध्ये काजोलबरोबर दिसेल. याआधी या दोघींनी 'दिलवाले' चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON
  2. दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड स्टार्सनी केला डान्स, पाहा व्हिडिओ - VARUN DHAWAN AND KRITI SANON
  3. करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.