ETV Bharat / entertainment

घटस्फोट झाल्यानंतर किरण रावनं आमिर खानला सिनेमाकरिता नाकारली भूमिका, 'हे' सांगितलं कारण

Laapata Ladies : चित्रपट दिग्दर्शिका किरण रावच्या 'लापता लेडीज'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेल प्रेक्षकांना खूप आवडला. आता किरणनं नुकताच खुलासा केला. आमिर खाननं या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. पण त्याला नकार देण्यात आला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 3:13 PM IST

Laapata Ladies
लापता लेडीज

मुंबई - Laapata Ladies : 'लापता लेडीज' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. तिनं 'लापता लेडीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तिचा हा आगामी चित्रपट कॉमेडी असणार आहे. अलीकडेच किरणनं चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल एक मनोरंजक गोष्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं सांगतलं की, या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खाननंदेखील ऑडिशन दिलं होतं. मात्र, रवी किशनच्या ऑडिशननंतर किरणनं आमिरला या भूमिकेसाठी नाकारले. या चित्रपटामध्ये रवी किशन हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'लापता लेडीज'साठी आमिर खानचं झालं रिजेक्शन : अलीकडेच एका मुलाखतीत किरण रावनं याबद्दल खुलासा केला होता. किरणच्या म्हणण्यानुसार, आमिर या पात्रामुळे खूप प्रभावित झाला होता. त्यानं या भूमिकेसाठी लुक टेस्ट देखील दिला होता. आमिर लूक टेस्ट चांगलं असल्याचं किरण रावनं सांगितलं. यानंतर रवी किशनचं ऑडिशन झाल. यानंतर तिला अधिक योग्य या भूमिकेसाठी तो वाटला. तिनं या भूमिकेसाठी रवी किशनला साईन केलं. किरणनं 'लापता लेडीज' चित्रपटात प्रसिद्ध कलाकारांना कास्ट न करण्याबाबतही चर्चा केली. यावेळी तिनं सांगितलं की आमिरकडूनही तिला या चित्रपटासाठी पूर्णपणे पाठिंबा मिळाला आहे.

'लापता लेडीज' चित्रपटाबद्दल : या चित्रपटामध्ये रवी किशनशिवाय रंटा प्रतिभा, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, छाया कदम, दुर्गेश कुमार, सतेंद्र सोनी, प्रंजल पटेरिया आणि इतर काही कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे किरण ही पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटामध्ये करीना कपूरसोबत दिसला होता. आता पुढं तो 'सितारे जमीन पर'मध्ये जेनेलिया देशमुख आणि दर्शील सफारीसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्न हे करत आहेत. यानंतर त्याच्याकडे 'लाहोर १९४७' हा चित्रपटदेखील आहे.

हेही वाचा :

  1. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज
  2. पूनम पांडेवर कारवाई करण्याची मागणी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
  3. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा 'आशा भोसले' पुरस्कार पार्श्वगायक शान यांना जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.