ETV Bharat / entertainment

'किल'चा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; करण जोहरनं शेअर केली पोस्ट - kill teaser out soon - KILL TEASER OUT SOON

KILL teaser out soon : करण जोहरचा आगामी थ्रिलर क्राईम चित्रपट 'किल'चा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. करणनं सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

KILL teaser out soon
'किल'चा टीझर लवकरच रिलीज होईल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 2:36 PM IST

मुंबई - KILL teaser out soon : चित्रपट निर्माता करण जोहरचा आगामी थ्रिलर क्राईम आधारित 'किल' या चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख समोर आली आहे. 'किल' चित्रपटामधील छोटीशी झलक करणनं शेअर करत टीझर रिलीजची डेट जाहीर केली आहे. करणनं 9 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. 'किल' टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF)मध्ये प्रीमियर झाल्यानंतर या चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. करणनं सोशल मीडियावर 'किल' चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर करत लिहिलं, ''तुमच्या आयुष्याच्या रक्तरंजित सवारीसाठी तयार रहा, 'किल'चा टीझर उद्या म्हणजेच 4 एप्रिलला येतोय.''

'किल' चित्रपटाची स्टार कास्ट : 'किल' हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून लक्ष्य लालवानी आणि तान्या माणिक्तला बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 'किल' चित्रपटात राघव जुयालची देखील महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट निखिल नागेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाचे निर्माते करण जोहर (धर्मा प्रोडक्शन) आणि सिखिया एंटरटेनमेंट आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये, 48 व्या टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये 6 भारतीय चित्रपटांचा प्रीमियर झाला होता, ज्यामध्ये 'किल'चा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये करण जोहर, गुनीत मोंगा, निखिल नागेश भट्ट देखील उपस्थित होते.

'किल' चित्रपटाची कथा : 'किल' या ॲक्शन चित्रपटाची कहाणी नवी दिल्लीच्या एक्सप्रेस ट्रेनवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा खूप हटके आहे. भारतीय सैनिकांची एक जोडी ट्रेनमध्ये चढते, ज्यावर एक टोळी अचानक हल्ला करते. या ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांचे संरक्षण हे सैनिक करत असताना या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, या चित्रपटामधील अभिनेता लक्ष्य हा 'पोरस' या सर्वात महागड्या टीव्ही मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या टीव्ही शोचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. आता लक्ष्यचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट 'किल'च्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटाकडून लक्ष्यला खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. विजय-मृणाल स्टारर 'फॅमिली स्टार'ने रचला इतिहास, हा टप्पा गाठणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट - FAMILY STAR RELEASE
  2. अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday
  3. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माबरोबर मूव्ही डेटवर, व्हिडिओ व्हायरल - Tamannaah and vijay

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.