ETV Bharat / entertainment

'खेल खेल में'पासून ते 'वेलकम 3'पर्यत यंदा अक्षय कुमारचे रिलीज होणार सलग 5 चित्रपट - akshay kumar Movies - AKSHAY KUMAR MOVIES

Akshay Kumar Line Up : अक्षय कुमारचे आगामी 5 चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाकडून अक्षय कुमारला खूप अपेक्षा आहेत.

Akshay Kumar Line Up
अक्षय कुमार लाईन अप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:11 PM IST

मुंबई - Akshay Kumar Line Up : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारनं 2024 ची सुरुवात 'बडे मियाँ छोटे मियाँ' या फ्लॉप चित्रपटापासून केली. अक्षयला ॲक्शनपॅक्ड चित्रपटाकडून खूप आशा होती, मात्र एका आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 11 एप्रिल रिलीज झाला होता. दरम्यान, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'खेल-खेल में'ची रिलीज डेट आज 27 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. आता 2024मध्ये अक्षय कुमार कोणत्या चित्रपटात दिसणार याबद्दल जाणून घेऊया...

खेल खेल में : अक्षय कुमार, फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू आणि एमी वर्क स्टारर कॉमेडी चित्रपट 'खेल-खेल में' या वर्षी 6 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय, 9 सप्टेंबरला अक्षय कुमारचा 57 वा वाढदिवस आहे. तो त्याच्या वाढदिवशीच्या दिवशी चाहत्यांसाठी एक कॉमेडी घेऊन येत आहे.

सरफिरा : अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती दक्षिणेतील स्टार जोडपे सूर्या आणि ज्योतिका यांनी केली होती. दरम्यान 'सरफिरा'चं दिग्दर्शन सुधा कोंगारा प्रसाद यांनी केलंय.

स्काई फोर्स : अक्षय कुमार, सारा अली खान आणि निम्रत कौर स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'स्काय फोर्स' हा खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप केलवानी आणि अभिषेक कपूर यांनी केलंय. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वेलकम 3 : अक्षय कुमारचे चाहते अहमद खान दिग्दर्शित 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, संजय दत्त, रवीना टंडन, सुनील शेट्टी, लारा दत्ता, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, परेश रावल, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक , दलेर मेहंदी, राहुल देव, मिका सिंग, किकू शारदा, मुकेश तिवारी, इनौलहक आणि यशपाल शर्मा दिसणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे.

सिंघम अगेन : 15 ऑगस्ट 2024 रोजी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात अक्षय कुमारचा कॅमिओ करताना दिसणार आहे. अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ देखील कॅमिओमध्ये दिसणार आहेत. तर अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. 'कल्की एडी 2898'च्या निर्मात्यांनी शेअर केलं नवीन पोस्टर, आज होईल रिलीज तारखेची मोठी घोषणा - kalki 2898 ad
  2. 'तारक मेहता...' फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता, महत्त्वपूर्ण फुटेज पोलिसांच्या हाती - Gurucharan Singh Missing
  3. इलियाना डिक्रूझने दिली मायकेल डोलनशी लग्न केल्याची व एक मुलगाही असल्याची कबूली - Ileana Dcruz

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.