ETV Bharat / entertainment

दाऊदलाही आव्हान देणाऱ्या डॉन हुसैन उस्ताराची भूमिका साकारणार कार्तिक आर्यन - kartik aaryan - KARTIK AARYAN

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन आगामी चित्रपटात डॉन हुसैन उस्ताराची भूमिका साकारणार असल्याचं समजत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं सध्या शीर्षक ठरायचं आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:09 PM IST

Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST

मुंबई -Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनची झोळी सध्या चित्रपटांनी भरलेली आहे. 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया 3' नंतर आता कार्तिक आर्यनचे नाव आणखी एका चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. कार्तिक आता एका थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते विशाल भारद्वाज करणार आहेत. कार्तिक आर्यन या चित्रपटात डॉन हुसैन उस्ताराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. हा चित्रपट यापूर्वी सपना दीदींच्या नावानं बनवला जात होता, ज्यामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान आणि दीपिका पदुकोण दिसणार होते.

कार्तिक डॉन हुसैन उस्तराची भूमिका साकारणार : आता कार्तिकच्या या आगामी चित्रपटाची शुटिंग सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे. अंडरवर्ल्डमधील डॉन हुसैन उस्तारा असं एक नाव आहे, ज्याला दाऊद इब्राहिम हवा होता. डॉन हुसैन हा अंडरवर्ल्डच्या किंग विरोधात निर्भयपणे उभा राहिला होता. या चित्रपटाबाबत अद्यापही घोषणा झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. पहिल्यांदा कार्तिक एका डॉनच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळणार आहे. या शीर्षक नसलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कुठली अभिनेत्री दिसणार हे सध्या ठरलेलं नाही. मात्र लवकरच या चित्रपटाबाबत घोषणा होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

कार्तिकचा आगामी चित्रपट : कार्तिकनं त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' चित्रपटाचे दुसरे शेड्यूल सुरू केलं आहे आणि त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. 'भूल भुलैया 3' यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती दिमरी आणि विद्या बालन दिसणार आहे. दरम्यान कार्तिकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय पुढं तो 'आशिकी 3' या चित्रपटामध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie
  2. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts
  3. अभिनेत्री आलिया भट्टनं करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपटाचा दिला रिव्ह्यू , केली पोस्ट शेअर - alia bhatt

Last Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.