मुंबई Kartik Aaryan and Manu Bhaker : बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यननं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची नेमबाज मनू भाकरचा इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आभार मानलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर मनूनं कार्तिक आर्यन स्टारर स्पोर्ट्स बायोग्राफिकल चित्रपट 'चंदू चॅम्पियन' पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मनूनं सोशल मीडियावर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं कौतुक केलय. यानंतर कार्तिक आर्यन हा खूप आनंदी झाला आहे. तसंच मनूनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'चंदू चॅम्पियन'चा हा चित्रपट पाहतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.
भारताची नेमबाज मनू भाकरनं केलं कार्तिक आर्यनचं कौतुक : शेअर केलेल्या फोटोत मनू 'चंदू चॅम्पियन' चित्रपट पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत मनूनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "अखेर पॅरिस ऑलिम्पिक संपलं आणि मी घरी पोहोचताच 'चंदू चॅम्पियन' पाहिला, हा चित्रपट माझ्या विचारापेक्षा जास्त संबंधित आहे, तयारी, संघर्ष, अपयश, कधीही मागे हटणार नाही, कार्तिक आर्यनला खूप समर्पणानं भूमिका बजावल्याबद्दल सलाम, मी स्वतः एक खेळाडू असल्यानं मला माहीत आहे की हे इतकं सोपं नाही, विशेषत: जेव्हा आम्ही तयारी करतो. यामुळे तुम्ही एका पदकासाठी पात्र आहात." कार्तिक आर्यननं हीच पोस्ट शेअर करून शूटर मनूचे आभार मानल्यानंतर आता तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
कार्तिक आर्यननं मानले आभार : कार्तिकनं आभार मानत मनूसाठी पोस्टमध्ये लिहिलं, "व्वा, धन्यवाद मनू भाकर, मला हे क्षण नेहमी लक्षात राहतील, तुमच्यासारख्या खऱ्या चॅम्पियननं आमच्या कामाचं कौतुक केलं. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले आहे."'चंदू चॅम्पियन'बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू मुरलीकांत पेटकर यांच्या संघर्षावर आधारित आहे. ही भूमिका कार्तिक आर्यननं साकारली आहे. कबीर खाननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा :