ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर - Bhool Bhulaiyaa 3

'Bhool Bhulaiyaa 3' Shoot: कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया3'चे शूटिंग सुरू झालं आहे. त्यानं शूटच्या पहिल्या दिवसाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Shoot
भूल भुलैया 3चं शूट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 12:18 PM IST

मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 Shoot : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यननं त्याचा आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'चे शूटिंग सुरू केलं आहे. 9 मार्च रोजी कार्तिकनं 'भूल भुलैया 3' च्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यानं इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यानं क्लॅपबोर्डचा एक मोनोक्रोम स्नॅप शेअर केला. यावर त्यानं ''हिअर वी गो'' असं कॅप्शन दिलं आहे. त्यानं बॅकग्राउंडमध्ये 'भूल भुलैया 2' चा टायटल ट्रॅक जोडला आहे. आता 'भूल भुलैया 3'मध्ये मुख्य भूमिकेत विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि अ‍ॅनिमल फेम तृप्ती डिमरी आहेत. दिवाळी 2024च्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.

'भूल भुलैया 3'चं शुटिंग सुरू : 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मीनं केलं आहे. 'भूल भुलैया' फ्रँचायझीचा पहिला भाग हा प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये विद्या बालनबरोबरअक्षय कुमार आणि शायनी आहूजा हे मुख्य भूमिकेत दिसले होते. दुसऱ्या भागात कार्तिकनं तब्बू आणि कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन स्पेस शेअर केली. 'भूल भुलैया' फ्रँचायझी हीट ठरल्यामुळे आता या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. चित्रपट निर्माते भूषण कुमार यांनी 'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल म्हटलं, '' भूल भुलैया' फ्रँचायझीचं आमच्या मनात एक विशेष स्थान आहे. अनीस आणि कार्तिकसारख्या अविश्वसनीय प्रतिभा याला पुढं नेत आहे, याबद्दल मला खूप आनंद होत आहे. 'आम्ही एक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी तयार आहोत. हा सिनेमा प्रेक्षकांना दुप्पट हसवेल.''

कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट : कार्तिकनं नुकतेच त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा एका खेळाडूच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट आहे. कार्तिकनं या चित्रपटामध्ये चंदूची भूमिका साकारणार आहे. 'चंदू चॅम्पियन' हा कार्तिकचा दिग्दर्शक कबीर खानबरोबरचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ, श्रद्धा कपूर, विजय राज, राजपाल नौरंग यादव, भाग्यश्री पटवर्धन, पलक लालवाणी आणि इतर कलाकार काम करणार आहेत. कार्तिक पहिल्यांदाच स्पोर्ट्स ड्रामामध्ये काम करताना दिसत आहे. तो दिग्दर्शक अनुराग बासूच्या आगामी 'आशिकी 3' चित्रपटातही काम करणार आहे.

हेही वाचा :

  1. मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?
  2. मैदानचा ट्रेलर रिलीज : अजय देवगणने 'मैदान'मधून फुटबॉलचा सुवर्णकाळ परत आणला
  3. हीरामंडीचे सकल बन गाणे : अमीर खुसरोंच्या कवितेला भन्साळींच्या संगीतानं दिले पुनर्जिवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.