मुंबई -Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 : बॉलिवूडचा सुंदर अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहे. कार्तिकनं 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. तो नेहमीच सेटवरून स्वतःची झलकही शेअर करत असतो. अलीकडेच त्यानं जर्मनीमध्ये 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केलं. आता कार्तिक आर्यननं पुन्हा एकदा पुढील शेड्यूलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, काल रात्री त्यानं एका कार्यक्रमातील सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो सूटमध्ये खूप देखणा दिसत आहे. याशिवाय त्यानं दुसऱ्या एका फोटोमध्ये बहुप्रतीक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3'ची झलक देखील दाखवली आहे.
कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'चे पुढील शेड्युल सुरू : कार्तिक आर्यननं काल रात्री त्याच्या इंस्टा स्टोरीवर 'भुल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगचा क्लॅप बोर्ड शेअर केला, यावर टेक क्रमांक 3 लिहिलं आहे. शूटिंग कधी आणि कुठे सुरू आहे, याबद्दल त्यानं काहीही माहिती दिलेली नाही. कार्तिकच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंददायक बातमी आहे. अनीस बज्मी 'भूल भुलैया 3'चं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालन देखील दिसणार आहे. या चित्रपटात ती मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बोल्ड ब्युटी तृप्ती डिमरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय या चित्रपटात माधुरी दीक्षित देखील झळकेल.
'भूल भुलैया' फ्रेंचाइजी : 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 100 कोटीहून अधिकचा व्यवसाय केला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते. याआधी 2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार शायनी आहुजा, राजपाल यादव, परेश रावल आणि विद्या बालन यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. दरम्यान 'भूल भुलैया 3'ची निर्मिती भूषण कुमार करत आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.
हेही वाचा :