ETV Bharat / entertainment

कमल हासन आणि दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज कार्यक्रमात हजर - kamal haasan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 5:27 PM IST

Kalki 2898 AD : अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी ((IMAGE- IANS))

मुंबई - Kalki 2898 AD : साउथ सुपरस्टार प्रभास स्टारर आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट 'कल्की 2898 एडी'चा आज 19 जून रोजी मुंबईत प्री-रिलीज कार्यक्रम होणार आहे. यानिमित्तानं प्रभास त्याच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर 18 जूनच्या रात्री मुंबईत पोहोचला होता. आता साऊथचा सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही या कार्यक्रमात पोहोचले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कमल हसन आणि प्रेग्नंट दीपिका पदुकोण यांची झलक पाहायला मिळत आहे. कार्यक्रमासाठी निघताना दीपिकानं पांढरा शर्ट आणि आइस वॉश डेनिम परिधान केला आहे.

कमल हासनची मुंबईत झाली एंट्री : दरम्यान, दीपिका पदुकोण सप्टेंबर 2024 मध्ये आई होणार आहे. आजच्या कार्यक्रमात, दीपिका पदुकोण तिच्या गरोदरपणाच्या अनुभवाबद्दल चाहत्यांना काही रोमांचक अपडेट देखील देऊ शकते. दुसरीकडे, कमल हासन एअरपोर्टवर ऑल ब्लॅक लूकमध्ये स्पॉट झाले होते. कमल हासननं ब्लॅक हुडी घातली होती आणि त्याच्या डोक्यावर ऑलिव्ह कलरची टोपी देखील होती. 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये निर्माते चित्रपटाशी संबंधित विशेष माहिती देखील देणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन हे एकामागून एक व्हिडिओ शेअर करून 'कल्की 2898 एडी' बनवण्याचा अनुभव शेअर करत आहे.

'कल्की 2898 एडी'चं काउंटडाउन पोस्टरची चर्चा : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. प्रभास व्यतिरिक्त या चित्रपटात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, आणि दिशा पटानी यांसारखे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. बुधवार, 19 जून रोजी 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या काउंटडाउन पोस्टरसह नवीन पात्राची ओळख करून दिली होती. या पोस्टरमध्ये प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना-अभिनेत्री शोभना चंद्रकुमार आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट आतुरतेनं पाहात आहे. हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. शोभना चंद्रकुमार दिसणार 'मरियम'च्या भूमिकेत, 'कल्की 2898 एडी'चं नवीन पोस्टर रिलीज - Kalki 2898 AD
  2. सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN
  3. बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.