ETV Bharat / entertainment

जॅकलीन फर्नांडिसनं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना इस्टरच्या दिल्या शुभेच्छा - Jacquelien Fernandez - JACQUELIEN FERNANDEZ

Jacqueline Fernandez Easter : इस्टरच्या निमित्तानं हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जैकलीन फर्नांडिसनं तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Jacqueliene Fernandez Easter
जॅकलिन फर्नांडिस इस्टर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 3:30 PM IST

मुंबई Jacqueline Fernandez Easter : जैकलीन फर्नांडिस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. जॅकलीन फर्नांडिसनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या चाहत्यांना इस्टरच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आहे. या फोटोवर अनेकजण भरभरुन कमेंट्स करुन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तिनं डंगरी ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूप क्यूट दिसत आहे. फोटोत जॅकलीन हातात अंड असून हसतमुख पोझ देताना दिसत आहे. याशिवाय तिच्या दुसऱ्या हातात एक बासकेट आहे, ज्यामध्ये काही खाण्याचे पदार्थ आणि वस्तू दिसत आहेत.

जॅकलीन फर्नांडिसनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा : जॅकलीननं शेअर केलेल्या फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, ''जॅकलीन मी तुझा खूप मोठा चाहता आहे, तुझा प्रत्येक फोटो हा खूप सुंदर असतो. दुसऱ्या एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, ''जॅकलीन तुला इस्टरच्या खूप खूप शुभेच्छा'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''या फोटोमुळे माझा आजचा दिवस खूप सुंदर जाणार, तू खूप सुंदर दिसत आहे.'' याशिवाय काहीजण फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. जॅकलीन फर्नांडिसनं याआधी होळीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती खूप खास दिसत होती. तिनं या होळीचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, ''हॅपी होली रंग लीला '24 कोलकाता.''

जॅकलीन फर्नांडिसचे आगामी चित्रपट : जॅकलीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहे. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात तिच्याबरोबर अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, संजय दत्त, परेश रावल, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, किकू शारदा, दलेर मेहंदी यासारख्या अनेक स्टार्स असणार आहेत. या चित्रपटाची सध्या शुटिंग सुरू आहे. याशिवाय ती सोनू सूदबरोबर 'फतेह'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच ती 'हमारी शादी' या चित्रपटात देखील झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. विक्रांत मॅसीनं बाळाच्या नावाचा टॅटू बनवला, फोटो व्हायरल - Vikrant Massey
  2. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रणबीर कपूरनं केला खुलासा ; 'या' कारणामुळे वडील ऋषी कपूरनं फटकारलं! - the Great Indian Kapil Show
  3. 'देसी गर्ल' प्रियांकाच्या पती निकनं सर्वांना शांत राहण्याची केली सूचना, मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल - priyanka chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.