मुंबई - T20 World Cup 2024 : टी - 20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर भारत हा अडचणीत वाट होता. मात्र यानंतर भारतीय संघानं शानदार पुनरागमन करत धमाकेदार विजय मिळवला. भारतीय टीमच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाच वातावरण आहे. दरम्यान विजयाचा आनंद बॉलिवूडनेही साजरा केला आहे. भारताच्या विजयाबद्दल सर्व सेलिब्रिटींनी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. भारतानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी - ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला आहे.
बॉलिवूड स्टार्सनं भारतीय संघाचं केलं अभिनंदन : वरुण धवननं त्याच्या इंस्टा स्टोरीवर सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय सामना आहे, काय कामगिरी आहे, टीम इंडिया! जय हिंद." यानंतर अमिताभ बच्चन यांनीही भारतीय संघाचे कौतुक करत लिहिलं, "अरे बाप रे बाप! आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहत होतो आणि आम्ही हरणार आहोत असे वाटल्यावर मध्येच टीव्ही बंद केला! पण अचानक मी इंटरनेट पाहिलं आणि आपण जिंकलो हे कळलं. इंडिया, इंडिया, इंडिया." तसेच सिद्धार्थ मल्होत्रानेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर भारतीय संघाचा फोटो पोस्ट करून आपला उत्साह शेअर करत लिहिलं, "काय विजय, टीम इंडिया, हॅपी संडे!"
स्टार्सनं केल्या पोस्ट शेअर : कार्तिक आर्यननं भारतीय संघाचे अभिनंदन करत लिहिलं, 'टीम इंडिया चॅम्पियन बनेल. काय विजय आहे !" भारताच्या विजयावर प्रीती झिंटानेही आनंद व्यक्त केला आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, "वा, काय सामना आहे." काय पुनरागमन आणि कसली झुंज. 119 धावांचा बचाव करणाऱ्या भारतीय संघाला पूर्ण गुण मिळेल.अविश्वसनीय कामगिरीसाठी गोलंदाजी युनिटचा विशेष अभिनंदन." कुणाल खेमू आणि बॉबी देओल यांनीही टीम इंडियाच्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांबरोबर या सामन्याचा आनंद घेतला. याशिवाय ईशान खट्टर आणि श्रद्धा कपूरनं देखील पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY
- प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजपूर्वी दीपिका पदुकोणचं नवीन पोस्टर केलं रिलीज - Kalki 2898 AD
- सोनम कपूरनं तिचा 39वा वाढदिवस स्कॉटलंडमध्ये केला साजरा, फोटो झाले व्हायरल - SONAM KAPOOR 39TH BIRTHDAY