ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग स्टारर 'शक्तिमान'चे कधी शूटिंग सुरू होणार? जाणून घ्या तपशील - रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंगला आगामी 'शक्तिमान' या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत सामील केले जाणार आहे. बेसिल जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे.

Ranveer Singh Starrer Shaktimaan
रणवीर सिंग स्टारर 'शक्तिमान'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 1:41 PM IST

मुंबई - अलिकडेच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसह दिसलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पुढील काही वर्षे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये खूप बिझी असणार आहे. 'डॉन 3' आणि 'सिंघम अगेन' व्यतिरिक्त रणवीर सिंग आगामी बासिल जोसेफ दिग्दर्शित 'शक्तीमान' नावाच्या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटासाठी तयारी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 'डॉन 3' चे शूटिंग भारतात आणि परदेशात सात महिन्यांच्या कालावधीत मार्च 2025 पर्यंत पूर्ण केलं जाईल. त्यानंतर, रणवीर सिंग 2025च्या मे महिन्यात शक्तीमान चित्रपटावर काम करण्यास सुरवात करेल. 'डॉन 3' नंतर अभिनेता रणवीर सिंग 'शक्तीमान'च्या शूटिंगमध्ये पूर्णता बिझी होईल. चित्रपटाची स्क्रिप्ट तीन वर्षांहून अधिक काळापासून विकसित होत आहे, आणि टीमने शेवटी 'शक्तीमान'च्या व्यक्तरेखेला न्याय देणारी पटकथा आणली आहे. बेसिल जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंडिया आणि साजिद नाडियाडवाला करणार आहेत.

सप्टेंबर २०२३ मध्ये इंस्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान, टोविनो थॉमसने रणवीर सिंग आणि बेसिल जोसेफ यांच्यातील संभाव्य चित्रपटात एकत्र येण्याचे संकेत दिले होते. टोविनोचा '2018' हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला तेव्हा तो लाईव्हमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधत होता. तेव्हाच रणवीर सिंगने त्याला 'मुंबईहून खूप प्रेम', असा संदेश दिला होता.

टोविनोने रणवीरची प्रतिक्रिया लक्षात घेतली आणि त्याचे कौतुक केले. रणवीरला त्याच्यासोबत काम करताना आनंद कसा वाटेल याविषयी टोविनोने दिग्दर्शक बेसिल जोसेफशी चर्चा केली होती, असा उल्लेख त्या काळात होता. टोविनोने या प्रकल्पाचे नाव जाहीर केले नसले तरी, रणवीर आणि बेसिल खरोखरच आगामी प्रयत्नासाठी एकत्र येत असल्याचे त्याने संकेत दिले आहेत.

रणवीरचा 'सिंघम अगेन' 2024 मध्ये रिलीज होणार आहे, तर फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3', 2025 मध्ये थिएटरमध्ये येण्याची अपेक्षा आहे, 2026 मध्ये 'शक्तीमान'ची रिलीज अपेक्षित आहे. अलिकडे, रणवीर इतर अनेकांशी बोलणी करत असल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. तसेच तो दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील संभाव्य सहकार्यांसाठी दिग्दर्शकांचाही शोध घेत आहे.

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी संदीप सिंग सज्ज
  2. 'टाईमपास' फेम 'दगडू'नं स्वतःच्या साखरपुड्यात आयुष्यातील खऱ्या 'प्राजू'सह केला बेभान होऊन डान्स
  3. "अनुपम खेरनं कंगवा खरेदी केला!!" पाहा, अनुपमला कंगवा विकणाऱ्याचा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.