ETV Bharat / entertainment

'गरीबांचा मसिहा' सोनू सूदनं केलं होतं 'या' साऊथ चित्रपटातून पदार्पण, उघडलं नशीब - sonu sood

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 1:58 PM IST

Updated : Jul 30, 2024, 5:19 PM IST

Happy Birthday Sonu Sood : सोनू सूदसाठी आज 30 जुलै हा दिवस खूप विशेष आहे. आज त्याचा वाढदिवस असल्यानं त्याला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Happy Birthday Sonu Sood
सोनू सूदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (instagram)

मुंबई - Happy Birthday Sonu Sood : 'गरीबांचा मसिहा' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद आज 30 जुलै रोजी त्याचा 51वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनू सूद हा 'खरा हिरो' असल्याचं त्याचे अनेक चाहते म्हणतात. त्यानं कोविड -19मध्ये अनेक लोकांची मदत केली होती. कोविड -19 मुळे जेव्हा देशात हाहाकार माजला होता, तेव्हा सोनू सूदनं मदतीचा हात देऊन अनेकांचे प्राण वाचवले होते. आजही सोनूच्या घराजवळ मदत मागणाऱ्यांची गर्दी जमते. त्यानं चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. अभिनेता असून देखील तो साधा राहतो आणि सामाजिक कामांमध्ये मदत करतो.

सोनू सूदचा प्रवास : 30 जुलै 1973 रोजी सोनूचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. त्याचे वडील शक्ती सूदचं कपड्यांचं दुकान होतं आणि आई सरोज सूद या शिक्षिका होत्या. सोनूची बहीण मोनिका ही वैज्ञानिक आहे. याशिवाय सोनू सूदनं देखील इंजीनियरिंग केलंय. त्यानं कॉलेजच्या दिवसात मॉडेलिंग सुरू केली होती. 1996 मध्ये वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सोनूनं आंध्र प्रदेशातील सोनाली श्रीधरशी लग्न केलं. दोघांची भेट अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली होती. 1999 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी सोनूनं 'कल्लाझागर' या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. 2002 मध्ये, सोनूनं 'शहीद-ए-आझम' या देशभक्तीपर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2004 मध्ये त्यानं 'युवा' चित्रपटात अभिषेक बच्चनच्या भावाची भूमिका साकारली होती. यानंतर, 2005 मध्ये, 'आशिक बनाया आपने' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाद्वारे त्यानं प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटानंतर त्याला बॉलिवूडमध्ये एक ओळख मिळाली. यानंतर तो 'जोधा अकबर', 'दबंग, 'सिंग इज किंग', 'हॅपी न्यू इयर', 'सिम्बा' या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसला. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये सोनूनं अभिनेता आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. सोनूनं एमटीव्ही रोडीज सीझन 19 आणि 20 मध्ये जज म्हणून काम केलंय.

सोनू सूदचा आगामी चित्रपट : सोनू सूद हा 'फतेह' या ॲक्शन क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सोनू सूद स्वतः निर्मित केला आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त तो चाहत्यांना एक मोठी भेट देऊ शकतो. दरम्यान सोनू सूदच्या आगमी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, पुढे तो मल्याळम चित्रपट 'रामबाण'मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याचा तामिळ चित्रपट 'मध गज राजा' हा देखील 22 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. दरम्यान सोनू सूद अजूनही 'सूद चॅरिटी फाऊंडेशन' या एनजीओच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करत आहे.

हेही वाचा :

  1. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away
  2. सोनू सूदच्या पाया पडली महिला चाहती, फोटो व्हायरल - Sonu Sood
  3. सोनू सूदनं शूज चोरी करणाऱ्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा केला बचाव, युजर्सनं केलं ट्रोल - SONU SOOD

Last Updated : Jul 30, 2024, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.