ETV Bharat / entertainment

'हमारे बारह' चित्रपटावरील स्थगिती उठवली; मात्र तीन सदस्यीय समितीला चित्रपट पाहण्याचे न्यायालयाचे आदेश - mumbai high court

Hamare Baarah Film : सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हमारे बारह चित्रपट प्रदर्शित करायला बुधवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगिती दिली होती. मात्र आजच्या सुनावणीत चित्रपटावरील स्थगिती उठवलीय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 8:40 PM IST

मुंबई Hamare Baarah Film : सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हमारे बारह चित्रपट प्रदर्शित करायला बुधवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगिती दिली होती. याप्रकरणी 10 जूनला नियमित खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार होती. मात्र, गुरुवारी सकाळी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी गुप्ता व इतरांनी न्यायालयासमोर याप्रकरणी तत्काळ सुनावणी करण्याची मागणी केली. या सुनावणीत चित्रपटावरील स्थगिती उठवली. न्यायमूर्ती कमल खता व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. खंडपीठानं याबाबत सेन्सॉर बोर्डाच्या तीन सदस्यीय समितीनं हा चित्रपट पाहून यात घेण्यात आलेल्या आक्षेपांवर आपलं निरीक्षण शुक्रवारी सकाळी 9 वाजता खंडपीठाला कळवावे, असे निर्देश दिले आहेत. या समितीनं नमूद केलेल्या निरीक्षणानंतर खंडपीठ या याचिकेवर निर्णय घेईल, असं स्पष्ट करण्यात आले.

काय होता आक्षेप : या चित्रपटाबाबत बुधवारी न्यायमूर्ती एन. आर. बोरकर व न्यायमूर्ती कमल खता यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. या प्रकरणी राज्यातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड कविता सोळुंके उपस्थित होत्या. अ‍ॅड अद्वैत सेठना यांनी सेन्सॉर बोर्डाची बाजू मांडली. तर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड मयूर खांडेपारकर यांनी बाजू मांडली. मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणातील आयत क्रमांक 223 चा दाखला देऊन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे संवाद तोंडी घालण्यात आले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहेत. सदर आयतचा प्रत्यक्षात असलेला अर्थ पूर्णतः चुकीचा दाखवून मुस्लिम समाजाची व मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या दृष्टीनं हे संवाद तयार करण्यात आले आहेत, असं मत याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे.

"न्यायालयानं दिलेल्या आदेशानं थोडेसं आश्चर्य वाटलं. सेन्सॉर बोर्डाचा सदस्य त्या समितीत असण्याऐवजी धर्मगुरु किंवा इस्लामच्या अभ्यासकाचा समावेश करण्याची गरज होती. या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत." - अजहर तांबोळी, याचिकाकर्ता

"7 जूनला हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता मात्र उच्च न्यायालयानं त्यावर स्थगिती दिल्याने आम्ही आज हे प्रकरण खंडपीठासमोर आणले. या प्रकरणी तीन सदस्यीय समिती चित्रपट पाहून निर्णय घेईल व न्यायालयाला आपलं मत सांगेल. शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवण्यात आलीय." - रवी गुप्ता, दिग्दर्शक

पोलिसांनी कारवाई न केल्यानं न्यायालयात दाद : या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यानं न्यायालयात दाद मागण्यात आली.

हेही वाचा :

  1. 'जुग जुग जिओ 2'च्या सीक्वेलमध्ये वरुण धवनबरोबर दिसणार टायगर श्रॉफ.... - tiger shroff
  2. कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.