ETV Bharat / entertainment

हिना खान आणि मुनावर फारुकी स्टारर 'हल्की-हल्की सी' गाण्याच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर - हिना खान आणि मुनावर फारुकी

'Halki Halki Si' Teaser release date out : स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी आणि हिना खानचा 'हल्की-हल्की सी' या म्युझिक अल्बमच्या टीझर रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय या जोडीचं एक पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे.

Halki Halki Si Teaser release date out
हल्की हल्की सीचं टीझर रिलीज तारीख जाहीर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 5:38 PM IST

मुंबई - 'Halki Halki Si' Teaser release date out : टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस 17'चा विजेता आणि वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी हा सध्या खूप चर्चेत आहे. मुनावर हा टीव्ही अभिनेत्री हिना खानबरोबरच्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. आज 17 फेब्रुवारीला मुनावर आणि हिनाचा हा म्युझिक अल्बमच्या टीझर रिलीज घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आज या जोडीचं पहिले पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. मुनावरचे पोस्टर अनेकांना खूप आवडलं आहे. आता अनेकजण त्याच्या या म्युझिक अल्बमची वाट पाहात आहेत, अशी प्रतिक्रिया मुनावरचे चाहते देत आहेत.

गाणं कधी रिलीज होणार? : हिना आणि मुनावरनं या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या अल्बमबद्दलचा तपशील शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ''आमच्याबरोबर 'हल्की-हल्की सी'द्वारे प्रेमाचा आस्वाद घ्या.''हल्की-हल्की सी' हे गाण्याचा टीझर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रिलीज होणार आहे. हे गाणे अनीस कौर आणि साज भट्ट यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल संजीव चतुर्वेदी यांनी लिहिले असून त्यांनी संगीत देखील दिलंय. हा म्युझिक व्हिडिओ अ ट्रू मेकर्स फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. हे गाणं प्लेडीएमएफच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे.

मुनावर फारुकी फॅन फॉलोईंग : मुनावरचे यापूर्वी हिना खानबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांबरोबर सेटवर मजा करताना दिसले होते. त्यांचे हे फोटो चाहतांना खूप आवडले होते. दरम्यान बिग बॉस' शोदरम्यान मुनावरच्या चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला होता. हा शो जिंकल्यानंतर त्यानं चाहत्यांचं खूप आभार मानले होते. याशिवाय अलीकडेच 'बिग बॉस 17' हा शो संपल्यानंतर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धेक या पार्टीचा आनंद घेताना दिसले. 'बिग बॉस 17'पूर्वी मुनावर फारुकीनं कंगना राणौतचा रिॲलिटी शो 'लॉक अप'चा ताजही जिंकला आहे.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्नानं चाहत्याकडून स्वीकारला लाल गुलाब, 'नॅशनल क्रश'वर कौतुकाचा वर्षाव
  2. कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'चं शीर्षक बदललं ; जाणून घ्या नवं नाव...
  3. 'गामी' चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.