ETV Bharat / entertainment

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी, सलमान-इमरानपासून प्रिती झिंटापर्यंत तारे तारकांची हजेरी - Baba Siddiqui Iftar Party - BABA SIDDIQUI IFTAR PARTY

रमजानच्या महिन्यात बाबा सिद्दिकी आणि झीशान सिद्दीकी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. सालाबादप्रमाणे यंदाही या पार्टीला बॉलिवूड सेलेब्रिटींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. यासाठी कोण हजर होतं हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Celebrities at Baba Siddiqui's Iftar Party
बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सेलेब्रिटी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 10:35 AM IST

मुंबई - बाबा सिद्दीक आयोजित इफ्तार पार्टी ही बॉलिवूड जगतासाठी खास मानली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय तारे तारका, राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील सेलेब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलेल्या सिद्दीकी यांनी रविवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं होतं. मुंबईतील वांद्रे भागातील पंचतारांकित प्रॉपर्टीवर आयोजित या पार्टीसाठी सेलेब्रिटींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

'टायगर 3' मधून रुपेरी पडद्यावर अलिकडेच झळकलेला सुपरस्टार सलमान खान त्याचे वडील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्यासह कार्यक्रमात हजर होता. सलमानने ग्रे रंगाच्या शेरवानीसह आपला रुबादारपणा यावेळी दाखवला. सलीम खान यांनी आपला लूक कॅज्युअल ठेवला होता. रविवारी वाढदिवस साजरा करत असलेला बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी इफ्तार पार्टीत हजर राहिला आणि त्याने कार्यक्रमस्थळी वाढदिवसाचा केक कापला.

इफ्तार पार्टीमध्ये ग्लॅमरची काही कमी नव्हती. अभिनेत्री प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा स्टाईलमध्ये पोहोचल्या. निळ्या रंगाच्या सूटमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क असलेलल्या ड्रेसमध्ये प्रिती तिच्या देसी अवतारात खूच सुंदर दिसत होती. ग्लॅमरस दिसण्यासाठी तिने हलका मेकअप आणि स्टेटमेंट झुमके निवडले होते. तिच्या रुळणाऱ्या केसांमुळे तिच्या एथनिक लूक छान दिसत होता.

स्टाईलमध्ये इफ्तार पार्टीला पोहोचलेल्या शिल्पा शेट्टीनं नेक लाईनवर जाळीचे कलाकुसर असलेला पांढरा सॅटीनचा को-ऑर्डर सेट घातला होता. तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टीही उपस्थित होती.

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता करण कुंद्राही त्याची प्रेमिका तेजस्वी प्रकाशच्या बरोबर या कार्यक्रमात पोहोचला. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनावर फारुकी देखील त्याच्या आणि एल्विश यादव यांच्या भोवती नुकत्याच झालेल्या वादानंतर कार्यक्रमात दिसला. 'बिग बॉस'ची आणखी एक माजी स्पर्धक शहनाज गिल देखील या कार्यक्रमात स्लीव्हज असलेल्या गाऊनमध्ये दिसली.

अभिनेता अर्जुन बाजवा या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्याने बॉम्बर जॅकेट, चिनो आणि पांढरा टी-शर्ट असा प्रासंगिक पोशाख परिधान केला होता. अलिकडेच महाराणी या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकलेली अभिनेत्री हुमा कुरेशी फुलांच्या पॅटर्नसह पारंपारिक पोशाखात दिसली. कार्यक्रमस्थळावरील इतर पाहुण्यांमध्ये शरीब हाश्मी, मन्नारा चोप्रा, गौहर खान आणि निर्माता फैसू यांचाही समावेश होता.

बाबा सिद्दीकी आयोजित इफ्तार पार्टी सिने उद्योगातील हाय प्रेफाइल कार्यक्रमांपैकी एक मानली जाते. एक काळ असा होता जेव्हा बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातून विस्तवही जात नव्हता. दोघांच्यामध्ये 5 वर्षे दीर्घकाळ कलह सुरू होता. याकाळात संपूर्ण बॉलिवूड फिल्मइंडस्ट्री या दोन निष्ठावंतांच्या छावण्यांमध्ये विभागली होती. त्यांच्यातला हा वाद 2013 मध्ये आयोजित केलेल्या बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीत संपला होता. या दोघांनी बाबा सिद्दीकीच्या पार्टीत मिठी मारली होती.

हेही वाचा -

  1. पवन कल्याण आणि 'ओजी' टीमनं इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिनित्त पोस्टर केलं रिलीज - OG New Poster of Emraan Hashmi
  2. रिया कपूरनं 'क्रू' सेटवरचा करीना आणि क्रितीचा पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ केला शेअर, पाहा व्हिडिओ - Kareena Kapoor And Kriti Sanon
  3. देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज , पाहा व्हिडिओ - Bengal 1947 An Untold Love Story

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.