मुंबई - Fighter Movie : 'फायटर' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हृतिक रोशन आणि दीपिक पदुकोण स्टारर चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर हा काही दिवसापूर्वी रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ' या चित्रपटातील गाण्यांमध्ये हृतिक-दीपिकाची अप्रतिम केमिस्ट्री आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला 'यूए' (UA) प्रमाणपत्र दिलं आहे.
'फायटर' चित्रपटाची स्टाकास्ट : 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि इतर कलाकार आहेत. दरम्यान याआधी बातम्या येत होत्या की 'फायटर'चा रनटाइम 3 तास 10 मिनिटांचा असेल. यानंतर सिद्धार्थ आनंदनं 'एक्स'वर पोस्ट शेअर करून रनटाइम 2 तास 40 मिनिटांपेक्षा कमी असल्याचं सांगितलं होतं. सेन्सॉर बोर्डकडून 'यूए' प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, आता 'फाइटर'चा रनटाइम 2 तास आणि 46 मिनिटे असेल याची पुष्टी झाली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक आणि दीपिक हे अॅक्शमोडमध्ये दिसणार आहे. 'फायटर' हा एरियल अॅक्शन चित्रपट आहे.
'फायटर'नं करणार पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई : 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एअरफोर्स ऑफिसर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये हवाई स्टंट हे प्रेक्षकांना भरपूर पाहायला मिळणार आहेत. 'वॉर' नंतर, हृतिक रोशन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'फायटर' चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगला व्यवसाय करताना दिसत आहे. या चित्रपटाला 25-30 कोटींची चांगली ओपनिंग मिळू शकते. हृतिकचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट हा ठरू शकतो, असं बोललं जात आहे. या चित्रपटाकडून हृतिक आणि दीपिकला खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :