ETV Bharat / entertainment

कोलकाता प्रोटेस्टमध्ये अरिजित सिंगची एन्ट्री, 'आर कोबे' गाण्यानं केली न्यायाची मागणी - kolkata protest

Arijit Singh Kolkata Protest : कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार तसंच हत्या प्रकरणी आता देखील देशात निषेध सुरू आहे. या निषेधात अरिजित सिंग देखील सामील झाला आहे. त्यानं 'आर कोबे' गाणं गाऊन न्यायाची मागणी केली आहे.

Arijit Singh Kolkata Protest
अरिजित सिंग (अरिजीत सिंग (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 4:48 PM IST

मुंबई Arijit Singh Kolkata Protest : आरजी कर हॉस्पिटल, कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार तसंच हत्या प्रकरणी देशभरात निषेध होताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक अरिजित सिंगनं याप्रकरणी सुरू असलेल्या निषेधाला पाठिंबा दिला आहे. तो 'आर कोबे' या नवीन बंगाली गाण्याद्वारे या आंदोलनात सामील झाला आहे. 'आर कोबे' गाण्याच्या शेवटी पीडितेची प्रतिमा दाखविण्यात आली आहे. तिला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली असून कोलकात्यातील लोकांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, अशी आशा व्यक्त या गाण्याद्वारे करण्यात आली आहे.

अरिजित सिंगचं कोलकाता निषेधावर नवीन गाणं : 29 ऑगस्ट रोजी, काही तासांपूर्वी अरिजितनं त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर 'आर कोबे' गाण्याची लिंक शेअर केली. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं "आर कोबे" शीर्षक लिहिलंय. याशिवाय अरिजीतचं हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. ट्रॅक पोस्टरमध्ये पीडितेला न्याय मागणाऱ्या हाताची प्रतिमा देखील दाखविण्यात आली आहे. यूट्यूबवर अपलोड केलेल्या गाण्याच्या पोस्टवर अरिजितनं लिहिलं, "9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकात्यातील एका दुर्घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरच्या निर्घृण हत्येमुळे भारतभर निषेध व्यक्त करण्यात आला. हे गाणं न्यायासाठी एक आक्रोश आहे, मूकपणे वेदना सहन करणाऱ्या आणि बदलाची मागणी करणाऱ्या असंख्य महिलांसाठी एक विलाप आहे."

अरिजित सिंगनं केल्या व्यक्त भावना : यानंतर त्यानं पुढं लिहिलं, "या लढ्यात प्राण गमावलेल्या तरुण डॉक्टर 'अभया'च्या धैर्याला आम्ही आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो. लिंग-आधारित हिंसाचाराचा सामना करणाऱ्या सर्व महिलांबरोबर आम्ही एकजुटीनं उभे आहोत, आमचं गाणं देशभरातील डॉक्टरांचा आवाज आहे, जे डॉक्टर संकटांना तोंड देत अथक सेवा करतात, त्यांच्यासाठी हे गाणं आहे. 'हे केवळ प्रोजेक्ट गाणं नाही, ते एक कॉल टू ॲक्शन आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठीचा आपला लढा अजून संपलेला नाही, याची ही आठवण आहे. आमचे डॉक्टर, आमचे पत्रकार आणि आमचे विद्यार्थी हे केवळ आमचा आदरच नव्हे तर, ते सुरक्षिततेलाही पात्र आहेत. पुढं त्यानं लिहिलं, "आवाज उठवण्यात आमच्यात सामील व्हा. चला हे गाणं गात ग्रुपमध्ये सामील होऊया. हा आशेचा आवाज, न्यायासाठी साद घालणारा आणि बदलाचा आवाज बनू शकतो. अशा दु:खद घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू शकतो."

'आर कोबेचा अर्थ : अरिजितनं गायलेल्या गाण्याचा अर्थ 'हे कधी संपेल?' आहे. हे गाणं कोलकात्यातील न्याय वकिलांची सामायिक निराशा आणि आशा प्रतिबिंबित करते. कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी, रस्त्यांवर आक्रोश पाहायला मिळत आहे. तिच्यावर केलेला हल्ला हा खूप थरारक होता. आता देखील कोलकातामध्ये प्रदर्शन होत आहेत.

हेही वाचा :

  1. अरिजित सिंगनं दुबईतील कॉन्सर्टमध्ये माहिरा खानचं केलं कौतुक, व्हिडिओ व्हायरल - arijit singh and MAHIRA KHAN
  2. एकेकाळी रिॲलिटी शोमधून झाला होता बाहेर, आज पार्श्वगायनाचा 'बादशाहा' - Arijit Singh
  3. Leke Prabhu Ka Naam teaser: अरिजित सिंगच्या गाण्यावर सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची जबरदस्त झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.