ETV Bharat / entertainment

बायोपिकच्या माध्यमातून 'राज' झळकणार मोठ्या पडद्यावर? तेजस्विनी पंडितबरोबरचा फोटो झाला व्हायरल - Raj Thackeray Biopic - RAJ THACKERAY BIOPIC

Raj Thackeray Biopic : आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे जीवनपट बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात आणखी एका लोकप्रिय नेत्याच्या बायोपिकची भर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Raj Thackeray Biopic
राज ठाकरे (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 5:42 PM IST

Updated : Aug 16, 2024, 6:29 PM IST

मुंबई Raj Thackeray Biopic : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावरील 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यावर बायोपिक बनत असल्याची चर्चा सुरु झालीय. चित्रपट क्षेत्रातल्या मित्रमंडळींमध्ये रमणारा, कलाक्षेत्रातल्या नामवंतांसाठीचा 'राजा'माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास 'बायोपिक' रुपात रुपेरी पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांचं कलाप्रेम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चित्रपट आणि एकूणच कलाविश्वाशी असलेलं निकटचं नातं नवं नाही. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांची राज ठाकरे यांच्याजवळ उठबस असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी कलाविश्वात आपलं मैत्री जपली आहे. अनेक चित्रपटांच्या कथानकांविषयी राज ठाकरे यांच्याशी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चर्चा करत असतात. पण राज ठाकरे स्वतःच एखाद्या चित्रपटाचा विषय ठरले तर! तसं घडण्याची दाट शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या जीवनावर बायोपिक? : राज ठाकरे यांच्या जीवनावर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहे. या चर्चेची सुरुवात सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळे होत आहे. फोटोत अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित हिच्याबरोबर एक गृहस्थ काहीतरी चर्चा करताना दिसतात. या गृहस्थाची चेहरेपट्टी तसंच व्यक्तिमत्व राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य राखणारं आहे. तेजस्विनी पंडित हिनं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेतली होती. तसंच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेचं तिनं समर्थनही केलं होतं. त्यानंतर तेजस्विनी सोशल मीडियावर ट्रोलही झाली. हे कनेक्शन हा वर उल्लेखलेला फोटो याच्या आधारावर राज ठाकरे यांच्या बायोपिकवर लवकरच काम सुरु होणार, अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

तेजस्विनी ओलांडणार 'तिचा उंबरठा'? : राज ठाकरे यांचा बायोपिक खरंच बनतोय का? बनत असल्यास त्यात तेजस्विनीचं योगदान फक्त अभिनेत्री म्हणून असेल, निर्माती म्हणून असेल की अभिनेत्री-निर्माती म्हणून? की या बायोपिकच्या निमित्तानं तेजस्विनी अभिनय, निर्मितीचा उंबरठा ओलांडून दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतः तेजस्विनीच देऊ शकते. नेमकं हेच ती करत नाहीये. तेजस्विनी एका नव्या चित्रपटासाठी योगदान देत आहे. तो चित्रपट राज ठाकरे यांच्यावरचा बायोपिक नसेलही किंवा कदाचित असेलही. तूर्त तेजस्विनी तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी होणारी चर्चा 'एन्जॉय' करतेय.

हेही वाचा

  1. नारायण राणेंची खासदारकी धोक्यात ?; मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं समन्स, 12 सप्टेंबरला सादर करावं लागणार उत्तर - Bombay HC Summons To Narayan Rane
  2. "घरांच्या मोळ्या जाळून मतांच्या पोळ्या भाजता, म्हणून तुम्हाला गाडणार"; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डागली तोफ, मुख्यमंत्री चेहऱ्यावरुन केलं मोठं भाष्य
  3. 'वाळवी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कारानं शिक्कामोर्तब; कलाकारांनी व्यक्त केला आनंद, गुलमोहर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - Valvi Marathi film

Last Updated : Aug 16, 2024, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.