मुंबई - Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी ते राहत असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कथितरीत्या उडी मारुन आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली. कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान पुण्यात असलेली मलायका ही धक्कादायक बातमी ऐकून मुंबईला परतली होती. यावेळी मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान तिच्या घराबाहेर दिसला होता. याशिवाय या कठीण काळात अर्जुन कपूरनं देखील तिला पाठिंबा दिला.
पोलीस तपास सुरु : आता याप्रकरणी वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत आहे. सोशल मीडियावर अनेकजण या कठीण काळात मलायका आणि तिच्या कुटुंबासाठी शोकसंवेदना व्यक्त करत आहेत. एका पत्रकार परिषदेत डीसीपी राज टिळक रोशन यांनी तपासाबाबत माहिती दिली आहे. डीसीपी रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनिल अरोरा यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावर आढळून आला होता. आम्ही तपास करत आहोत, आमची टीम आणि फॉरेन्सिक तज्ञांचा सक्रिय सहभाग या केसमध्ये आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार ही आत्महत्या असल्याचं लक्षात येत असलं तरीहीअधिकारी सर्व संभाव्य शक्यतांचा विचार करुन आवश्यक तपास करत आहेत."
अनिल मेहतांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांची अपडेट : तसेच मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आणखी एक अपडेट दिली आहे, मृत्यूच्या काही काळ आधी अनिल यांचं मलायका आणि अमृता यांच्याशी बोलणं झालं होतं. संभाषणादरम्यान अनिल यांनी म्हटलं होतं "मी आजारी आहे आणि थकलो आहे." अनिल यांनी जेव्हा कथित आत्महत्या केली तेव्हा मलायकाची आई घरी होती. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर मलायका हादरवून गेली आहे. तिनं तिच्या वडिलांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं - तुम्हा सर्वांना सांगताना दुःख होत आहे की, आमचे वडील अनिल मेहता, एक उत्तम मनुष्य, एक अद्भुत आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमच्या सर्वांचे सर्वात चांगले मित्र आता आपल्यात नाहीत. आमच्या कुटुंबाला सध्या मोठा धक्का बसला आहे. आम्ही सर्व मीडिया आणि शुभचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करतो. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आता मलायकानं केलेली पोस्ट ही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मलायकाच्या आईनं निवेदनात काय सांगितलं? : मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प यांनी पोलिसांना सांगितलं की, "अनिलचा सकाळचा दिनक्रम असा होता की तो बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत होता. आमच्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. पण आम्ही काही वर्षांपासून पुन्हा एकत्र राहत होतो. घटनेच्या दिवशी सकाळी मी दिवाणखान्यात अनिलची स्लीपर असल्याचं पाहिलं. त्यानंतर मी बाल्कनीत शोध सुरू केला, मात्र तो तिथेही दिसला नाही. जेव्हा मी खाली पाहण्यासाठी बाल्कनीत गेले, तेव्हा मी गोंधळ पाहिला आणि इमारतीचा चौकीदार ओरडत असून मदत मागत होता. तेव्हा मला जाणवलं की, काहीतरी वाईट घडलं आहे." अनिल यांना गुडघेदुखीचा त्रास वगळता कोणताही आजार नसल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा :
- सोन्यासारख्या दोन मुली असताना केली आत्महत्या, मलायका आणि अमृताचे वडील अनिल मेहता यांनी जीवन संपवलं - ANIL ARORA
- मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठिशी खंबीर - arjun kapoor
- ब्रेकअपच्या चर्चेमध्ये गर्दीत मलायका अरोरानं केलं अर्जुन कपूरकडे दुर्लक्ष - MALAIKA and ARJUNs video viral