ETV Bharat / entertainment

'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - ajay devgan shaitaan - AJAY DEVGAN SHAITAAN

Shaitaan Box Office Collection Worldwide: अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत 'शैतान' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभरात 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

Shaitaan Box Office Collection Worldwide
'शैतान'चं जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 2:39 PM IST

मुंबई - Shaitaan Box Office Collection Worldwide: अभिनेता अजय देवगण आणि आर. माधवन स्टारर 'शैतान' रिलीज होऊन जवळपास एक महिना झाला आहे. हा चित्रपट गेल्या महिन्यात 8 तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'शैतान' चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला असून याला परदेशातही प्रचंड प्रेम मिळत आहे. या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान 'शैतान'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 140 कोटींचा आकडा गाठला आहे. विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

'शैतान'ची बॉक्सवर तुफान कमाई : या चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 14.75 कोटींची कमाई केली. यानंतर 'शैतान'नं पहिल्या आठवड्यात 81.31 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 36.08 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 20.04 कोटी रुपये कमावले. तर, गेल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाची कमाई 4.34 कोटींची झाली आहे. अशाप्रकारे या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 142.06 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. आता हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटी लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आर. माधवन, साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि जांकी बोडीवालाच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.

जगभरातील कलेक्शन : 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'शैतान'च्या ओव्हरसीज कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 15 मार्चपर्यंत या चित्रपटाची कमाई 117.47 कोटींवर पोहोचली होती. तर 22 मार्चपर्यंत 150 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर 'शैतान'नं एकूण जगभरात 168.42 कोटींची कमाई केली होती. यानंतर गेल्या आठवड्यात या चित्रपटानं जगभरात 187.82 कोटींचा व्यवसाय केला. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन कलेक्शनबद्दल अपडेट जारी केले आहे. 'शैतान' चित्रपटानं जगभरात 201.73 कोटींची कमाई केली. आता हा चित्रपट 8 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर धडकण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. विजय-मृणाल स्टारर 'फॅमिली स्टार'ने रचला इतिहास, हा टप्पा गाठणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट - FAMILY STAR RELEASE
  2. अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday
  3. अदा शर्मानं नेसली आजीची साडी; किंमत कळल्यावर व्हाल थक्क! - Adah Sharma

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.