मुंबई - Adah Sharma : 'केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा गेल्या वर्षभरापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेणार असल्यामुळे चर्चेत आहे. आता या बातम्यांवर तिनं आपलं मौन सोडलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या रहस्यमय मृत्यूनंतर त्याचे मुंबईतील अपार्टमेंट अजूनही रिकामे आहे. या अपार्टमेंटमध्ये एकही भाडेकरू राहण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, जेव्हा अदा शर्मानं गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंटला भेट दिली, तेव्हा ती अपार्टमेंट खरेदी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अदा शर्मानं सुशांत सिंहबद्दल केला खुलासा : आता नुकत्याच एका मुलाखतीत अदानं यावर आपले मौन सोडलं आहे. या बातम्यांवर अदानं म्हटलं, ''सध्या इतकंच म्हणेन की मी प्रत्येकाच्या मनात राहते. जेव्हा मी सुशांतचे अपार्टमेंट बघायला गेले, तेव्हा मीडियाचं लक्ष माझ्याकडे गेले. तेव्हा मला आनंद झाला, पण मला माझी प्राइवेसी प्रिय आहे. मला सुशांतबद्दल आदर आहे आणि मला वाटते की अशा व्यक्तीबद्दल बोलणं चुकीचं आहे जे जगात अस्तित्वात नाही. सुशांतनं चांगले चित्रपट केले आहेत, मी त्याच्यासाठी उभी नाही, पण मी त्याचा आदर नक्कीच करते. आता देखील अदानं सुशांतच्या अपार्टमेंट घेण्याबद्दल काहीही विधान केलेले नाही.
सुशांत सिंहचा मृत्यू : सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी वांद्रे, मुंबई येथे त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे ठरवण्यात आले आहे. पोस्टमॉर्टम अहवालात सुशांतचा मृत्यू फाशीमुळे श्वास गुदमरल्यानं झाल्याची पुष्टी करण्यात आली होती. दरम्यान अदा शर्माबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'बस्तर: द नक्सल स्टोरी' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर काही खास कामगिरी करू शकला नाही. अदाच्या 'द केरळ स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. 'द केरळ स्टोरी'नं चित्रपटमध्ये हिरो नसताना देखील जबरदस्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती.
हेही वाचा :