ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन'च्या बॉक्स ऑफिसवरील क्लॅशवर माधुरी दीक्षित केलं विधान - BHOOL BHULAIYAA 3

'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता याबद्दल माधुरी दीक्षितनं आपलं मत व्यक्त केलंय.

madhuri dixit
माधुरी दीक्षित (माधुरी दीक्षित (IANS/FILM POSTER))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 27, 2024, 5:30 PM IST

मुंबई : दिवाळी 2024ला बॉक्स ऑफिसवर मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' आमनेसामने रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहेत. 'भूल भुलैया 3'मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता माधुरीनं बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या दोन्ही चित्रपटाच्या क्लॅशवर आपलं मत व्यक्त केलंय. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत माधुरीनं 'भूल भुलैया 3'बद्दल म्हटलं, "कोणता चित्रपट चालेल हे सांगणं फार कठीण आहे. पण मला माहित आहे की, आम्ही चांगला चित्रपट तयार केला आहे. आता हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे, त्यांना हा चित्रपट आवडेल की नाही."

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया'ची टक्कर : माधुरी दीक्षितनं पुढं सांगितलं, "आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही एक अतिशय मनोरंजक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मला सध्या फक्त एकच आशा आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. यानंतर माधुरीला अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'बरोबर 'भूल भुलैया'च्या टक्करबद्दल विचारले असता तिनं म्हटलं, "मला वाटते याआधीही दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते, या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठे स्टार होते. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे काहीही होऊ शकते, कदाचित दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर होतील."

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया' स्टार कास्ट : माधुरीनं पुढं म्हटलं, "आमच्या टीमनं या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिलंय. भविष्यातही चित्रपट सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. पण शेवटची परीक्षा थिएटरमध्ये आहे, तिथेच सर्व काही होईल. त्यामुळे आपण केवळ चांगल्याची आशा करू शकतो. आम्ही एवढेच म्हणू शकतो की, आमच्याकडे चांगले प्रोडक्ट आहे, कृपया या आणि पाहा." अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी हे देखील कलाकर आहेत. दरम्यान, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका आहेत. 1 नोव्हेंबर 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भूल भुलैया 3'च्या दिग्दर्शकाबरोबर अजय देवगणच्या 'नाम'ची घोषणा, 'सिंघम अगेन' नंतर रिलीज होणार सिनेमा
  2. 'भूल भुलैया 3'चा टायटल ट्रॅक रिलीज, कार्तिक आर्यनचे डान्स मूव्हीज अप्रतिम...
  3. कार्तिक आर्यननं दिलजीत दोसांझ आणि पिटबुलबरोबर टायटल ट्रॅकसाठी दिलं योगदान, पोस्ट व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.