ETV Bharat / bharat

'NEET-UG 2024' पेपर लीक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट; सरकारवर प्रश्नांची सरबत्ती - NEET UG 2024 Paper Leaked - NEET UG 2024 PAPER LEAKED

NEET-UG 2024 Row Supreme Court Hearing : NEET परीक्षा 2024 रद्द करण्याच्या मुद्द्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण इतके व्यापक झाले आहे का? की, फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागले, हे शोधणं महत्त्वाचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी वेळी नमूद केलं.

Etv Bharat
सर्वोच्च न्यायालय (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 4:27 PM IST

नवी दिल्ली NEET-UG 2024 Row Supreme Court Hearing : NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याबाबत आणि इतर मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं चुकीचं कृत्य (पेपरफुटीत सहभाग) करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकार आणि एनटीएनं काय कारवाई केली?, अशी विचारणा केली. पेपरफुटी झाली आहे हे सर्वमान्य सत्य आहे आणि त्याचं स्वरूप आम्ही ठरवत आहोत, असं न्यायालय म्हणालं.

सावधगिरी बाळगली पाहिजे : दोन विद्यार्थ्यांचा पेपरफुटीमध्ये हात आहे म्हणून तुम्ही संपूर्ण परीक्षा रद्द करू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं आपण पेपरफुटीच्या स्वरूपाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, असंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायालय 23 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण इतके व्यापक होते की नाही हे शोधणे आवश्यक आहे की, फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागले.

पेपर लीकचा फायदा घेणाऱ्यांना सोडू नये : चुकीचे काम करणाऱ्यांना आणि पेपर लीकचा फायदा घेणाऱ्यांना सोडू नये, असे निर्देश CJI चंद्रचूड यांनी दिले आहेत. तसंच सरकारनं केलेल्या कारवाईचा तपशीलही त्यांनी मागितला आहे. भविष्यात पेपर लीक होऊ नयेत यासाठी सरकार काय करत आहे? पेपर लीकचे लाभार्थी ओळखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत काय केलं? असे प्रश्न CJI डी वाय चंद्रचूड यांनी सीजेआयने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारले.

न्यायालयाचे सरकारला प्रश्न : CJI ने प्रश्नपत्रिकांच्या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले. प्रश्नपत्रिकांचे संच कधी तयार झाले? या लाखो प्रश्नपत्रिकांची छपाई कधी झाली? त्यांची वाहतूक केव्हा करण्यात आली? परीक्षेच्या तारखेपूर्वी ते कसे जमा झाले? असे अनेक प्रश्न न्यायालयाने सरकारला केले आहेत.

हेही वाचा - NEET घोटाळ्यातील मास्टरमाईंड लातुरातील शिक्षकाच्या संपर्कात; 'गंगाधर'ला ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलीस बंगळुरूत - NEET Exam Scam Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.