ETV Bharat / bharat

लाडकी बहीण योजनेचे सरकार निकष बदलणार, महिलांचे पैसे परत घेऊ नका- संजय राऊत - SANJASANJAY RAUT ON LADKI BAHIN

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडे पैसे परत मागू नका, अशी मागणी शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी केली. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut on  Ladki Bahin scheme
लाडकी बहीण योजना (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 11:09 AM IST

नवी दिल्ली- शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, " कोणतीही शहानिशा न करता महिलांना 1500 रुपये देण्यात आले. महिलांची मते विकत घेण्यात आली आहेत. एका घरात ३ महिलांना पैसे देण्यात आले. आता सरकारचे डोळे उघडले आहेत. सरकार नियम बदलणार आहे. पैसे देताना नियम आणि निकष आठवले नाहीत का?"

शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले, " निवडणुकीच्या आधी कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपयांचा व्यवहार केला. त्याबाबत आक्षेप घेण्यात आला. नवीन मुख्यमंत्र्यांनीदेखील निकष बदलणार असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी महिलांना ती लाच होती. त्यांना फक्त मते घ्यायची होती. जास्त उत्पन्न असलेल्या लाडकी बहिणींना पैसे जातात, हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आल्याचं माझ्या वाचनात आले. लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी योजना आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लाख महिला लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. आता तिजोरीवर भार पडत असताना त्यांचे डोळे उघडले आहेत. पण, ज्या महिलांना पैसे दिले ते पैसे परत घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवू नका. जे घडतेय, त्यांच्यावर आमचे लक्ष आहे".

लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 रुपये धेण्यात येणार- महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील ऐतिहास विजयाचं श्रेय हे लाडकी बहीण योजनेला दिले. निकालानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरुच राहणार असल्याचं जाहीर केलं. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मासिक 1500 रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून आता 2100 रुपये करण्याचं महायुतीनं विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं. लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, अधिवेशनात वाढवी निधी मंजुरीनंतरच हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारनं 2024-25 च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. नोव्हेंबरमध्ये 2.34 कोटी पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 7,500 रुपये (जुलै ते नोव्हेंबरसाठी) जमा केले आहेत.

हेही वाचा-

  1. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं
  2. 'लाडकी बहीण योजने'तील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांना संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.