ETV Bharat / bharat

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी का निवडला गेला? का लागू झाली भारतीय राज्यघटना ?

Republic Day 2024 : भारतात 26 जानेवारीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. 26 जानेवारी रोजी भारतीय राज्यघटना का लागू झाली? हे तुम्हाला माहिती आहे का?

Republic Day 2024
प्रजासत्ताक दिन 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 11:24 AM IST

Updated : Jan 27, 2024, 7:33 PM IST

हैदराबाद : प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त, इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर भव्य परेड आयोजित केली जाते. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? या मागचा इतिहास खूपच रंजक आहे.

म्हणूनच हा खास दिवस साजरा केला जातो : 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. भारत एक लोकशाही आणि संवैधानिक राष्ट्र झाला. म्हणूनच या विशेष दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. यावर्षी देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान बनवण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 26 जानेवारी 1949 रोजी राज्यघटना स्वीकारण्यात आली. अधिकृतपणे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.

26 जानेवारीलाच संविधान का लागू झाले ? 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी रोजी करण्यात आली. याचे कारण असे की या दिवशी 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं भारताला पूर्ण स्वातंत्र्य घोषित केले होते. वीस वर्षांनंतर त्याच दिवशी राज्यघटना लागू झाली.

संविधान तयार करायला इतके दिवस लागले : हाताने लिहिलेली राज्यघटना आजही संसदेच्या ग्रंथालयात सुरक्षित आहे. ते तयार करण्यासाठी दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान असल्याचं म्हटलं जातं. 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारीला संपूर्ण देशात संविधान लागू झाले. भारतीय राज्यघटनेच्या या प्रती हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये हस्तलिखित आहेत. आजही या प्रती संसद भवनातील ग्रंथालयात सुरक्षित ठेवल्या आहेत.

जाणून घ्या काही मनोरंजक तथ्ये

  • 1949 : भारतीय राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.
  • 1950 : भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि भारतीय राज्यघटना लागू झाली.
  • 1929 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन डिसेंबर महिन्यात लाहोर येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू होते.
  • 26 जानेवारी 1930 : ब्रिटिश सरकारने काहीही दिले नाही, त्या दिवशी काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा निर्धार जाहीर केला.
  • 26 जानेवारी 1930 : भारताने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. यानंतर देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून स्वीकारण्यात आला. आपली राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत तयार झाली. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाली आणि तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेची स्थापना झाली. 9 डिसेंबर 1946 पासून संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. संविधान तयार करताना एकूण 114 दिवस संविधान सभेची बैठक झाली.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्री दोन दिवसासांठी मूळ गावी, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; दौऱ्याचं कारण काय?
  2. सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा

Last Updated : Jan 27, 2024, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.