हैदराबाद Explosion Incident Company in Anakapalle- आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम SEZ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. एसेंशिया फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरचा स्फोट झाला. या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे आंध्रमध्ये खळबळ निर्माण झाली. हा स्फोट कशामुळे झाला, याची अद्याप कुणालाच माहिती समजली नाही.
#WATCH | Andhra Pradesh | Visuals from the spot where a reactor explosion incident occurred at a company in Atchutapuram SEZ, in Anakapalle, yesterday.
— ANI (@ANI) August 22, 2024
The death toll in the Atchutapuram SEZ explosion incident rises to 17: Anakapalle Collector Vijaya Krishnan pic.twitter.com/YTMu2BKjGE
अनकापल्ली जिल्ह्यातील एसेंशिया फार्मा कंपनीत लंच ब्रेक दरम्यान अचानक रिअॅक्टरचा स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. आगीमुळे एमआयडीसीमध्ये सर्वत्र धुराचे लोट दिसून आले आहेत. भीतीनं आरडाओरडा करत कामगार जीवाच्या भीतीनं कारखान्यातून पळाले. रिअॅक्टरचा स्फोट होताना कंपनीत शेकडो कामगार काम करत होते.
- मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी रिअॅक्टरच्या स्फोटाच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींना तातडीनं उपचार मिळवून देण्याकरिता उपाययोजना करण्याचे चंद्राबाबू यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पाच जणांची प्रकृती गंभीर- रिअॅक्टरचा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटात सापडलेल्या कामगारांच्या मृतदेहांचे अनेक तुकडे झाले. पाच जणांचे मृतदेह अनकापल्ली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेचं गांभीर्य ओळखून काही कामगारांनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पीडितांवर अनकापल्ली येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी पाच जण 60 टक्क्यांहून अधिक भाजल्यानं त्यांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांकडून कंपनीतीमधील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
- मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी अच्युतापुरम सेझ येथे झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी स्फोटाच्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं मदत आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले.