ETV Bharat / bharat

रामोजी राव यांनी माध्यम क्षेत्रात कशी क्रांती घडविली? वर्तमानपत्र ते डिजीटल माध्यमांमध्ये उमटविला अमीट ठसा - Ramoji Rao news - RAMOJI RAO NEWS

ईटीव्ही नेटवर्कचे प्रमुख आणि रामोजी ग्रुपचे अध्यक्ष चेरुकुरी रामोजी राव (वय ८८) यांचे आज पहाटे निधन झाले. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या मुलभूत तत्वांचा आग्रह धरत माध्यमांमधील निष्पक्षता आणि वाचकांशी बांधिलकी जोपासली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि टीव्ही माध्यमात क्रांती घडली.

Ramoji Rao Head of ETV Network
Ramoji Rao Head of ETV Network (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:49 AM IST

हैदराबाद - रामोजी राव यांनी देशात प्रथमच मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची सुरुवात केली. त्यांनी विविध राज्यांतील प्रेक्षकांसाठी स्थानिक भाषेत भाषा बातम्या आणि मनोजरंज उपलब्ध करून दिली. विविध राज्यांतील पत्रकार आणि कलाकारांना प्रतिभेसाठी नवीन व्यासपीठ मिळालं. प्रेक्षकांना आपल्या भाषेतील मनोजरंजनाची साधने मिळाल्यानं प्रादेशिक भाषांवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पकडा कमी होण्यास मदत झाली.

रामोजी राव यांनी लोकांच्या हितासाठी एकनिष्ठ राहून 'ईनाडू' या तेलुगू दैनिकातून हजारो पत्रकार घडवले. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते लोकांसाठी समर्पित जीवन जगले. टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून हजारो नव्या गुणवंत कलाकारांची रुपेरी पडद्यावर ओळख करून दिली. ईटीव्ही मराठी, ईटीव्ही कन्नड, ईटीव्ही तेलुगु, ईटीव्ही गुजराती अशा प्रादेशिक भाषांतील टीव्हीवरील दर्जेदार कार्यक्रम आणि बातम्यांना प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. असा चमत्कार घडविण्यामागे रामोजी राव यांनी गुणवत्तेचा घेतलेला ध्यास आणि गुणग्राहकता होती.

ईटीव्ही ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मातृसंस्था- रामोजी राव यांनी ऑगस्ट 1995 मध्ये तेलुगू प्रेक्षकांसाठी ईटीव्ही ही वाहिनी लाँच केली. ईटीव्हीनं अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर आपले नेटवर्क वाढवत 13 भाषांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया लाँच केले. ईटीव्ही चॅनेल म्हणजे विश्वसनीय बातम्या आणि दर्जेदार कार्यक्रम अशी संपूर्ण देशभरात ओळख निर्माण झाली. दर तासाला पहिले बुलेटिन, देशामध्ये वाहिनीचे प्रेक्षपण करण्यासाठी असलेले स्वत:चे अर्थ स्टेशन, ब्रेकिंग नव्हे फक्त विश्वसनीयता हे ब्रीद यामुळे ईटीव्ही मराठीसह इतर भाषांमधील ईटीव्ही वाहिन्यांच्या बातम्यांनी नवीन ट्रेंड तयार केले. ईटीव्हीच्या बातम्यांमधून जोपासलेली विश्वसनीयता आणि असंख्य पत्रकारांचे घडलिले करियर यामुळे ईटीव्ही ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मातृसंस्था मानली जाते.

टेलिव्हिजनवर विविध ट्रेंड सेट करणारे रामोजी राव- ईटीव्हीमधून मनोरंजन आणि शैक्षणिक कार्यक्रमातून ग्रामीणसह शहरांमधील युवावर्ग जोडण्यात आला. रामोजींच्या कल्पनेतून 'पदुता थियागा' कार्यक्रमाचा जन्म झाला. या सुरेल कार्यक्रमातून संगीताच्या दुनियेत शेकडो गायक उदयाला आले. ईटीव्ही मराठीतील 'कॉमेडी एक्सप्रेस', 'अन्नदाता', 'चार दिवस सासूचे' आणि 'चार दिवस सुनेचे' हे कार्यक्रम ग्रामीणसह शहरी भागात अत्यंत लोकप्रिय ठरले. रामोजींच्या प्रोत्साहनांनी अनेक कलाकारांनी मनोरंजनाच्या दुनियेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उषाकिरण मुव्हीजनं विविध भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची प्रमुख भूमिका असलेला 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट सुपरहिट ठरला. उषाकिरण मुव्हीज बॅनरच्या माध्यमातून अनेक कलाकारांंनी प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

ईटीव्ही भारतच्या माध्यमातून सर्वात मोठा डिजीटल मीडिया- डिजीटल माध्यमांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन ईटीव्हीनं 2019 मध्ये 'ईटीव्ही भारत' हा डिजीटल मीडिया लाँच केला. या माध्यमातून देशभरातील 725 जिल्हे, 29 राज्ये आणि 13 भाषांमधील बातम्या वाचकापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. याचबरोबर रामोजी ग्रुपनं ईटीव्ही प्लस, ईटीव्ही सिनेमा, ईटीव्ही लाईफ, ईटीव्ही बालभारत चॅनल लाँच केले. नावीन्यपूर्ण कार्यक्रमातून ईटीव्ही नेटवर्कनं रुपेरी पडद्यावर एक ट्रेंड सेट केला. इलेक्ट्रॉनिक माध्यम, टीव्ही इंडस्ट्री आणि चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेणाऱ्यांना रामोजी रावांमुळे भारतीय माध्यमांमध्ये एकप्रकारे क्रांती झाली.

हेही वाचा-

  1. 'ईटीव्ही परिवारावर' दु:खाचा डोंगर, प्रख्यात माध्यम सम्राट रामोजी राव यांचं निधन, रामोजी फिल्मसिटीतून लाईव्ह - Ramoji Rao Passed Away
  2. रामोजी ग्रुपचे संस्थापक, सुप्रसिद्ध माध्यम सम्राट रामोजी राव यांचं निधन, माध्यमक्षेत्रावर शोककळा - Ramoji Rao Passes Away

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.