नवी दिल्ली PM Modi Bill Gates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात विविध विषयांवर चर्चा झालीय. या चर्चेत पंतप्रधान मोदी आणि गेट्स यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, हवामान बदलाला तोंड देण्याच्या प्रयत्नांपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याआधी गुरुवारी त्यांच्या संभाषणाचा प्रमोशनल टीझर रिलीज करण्यात आला होता.
काय म्हणाले पंतप्रधान : भारतीय केवळ तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत तर प्रत्यक्षात आणखी पुढं जात असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणले की 'भारतात जन्मलेलं मूल 'एआय' आणि 'एआय' (मराठीत आई) असं ओरडतं.' तसंच पंतप्रधानांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथ वापरुन सेल्फी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. नमो ॲपनं अलीकडेच एक नवीन एआय पॉवर्ड फोटो बूथ वैशिष्ट्य सादर केलं. त्यामुळे वापरकर्त्यांना फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करुन पंतप्रधानांसोबतचे फोटो शोधून मिळतात. AI हे सरकारनं लक्ष्य केलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारतात AI तयार करण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेत, मंत्रिमंडळानं अलीकडेच 10 हजार 371.92 कोटी रुपयांच्या बजेटसह सर्वसमावेशक राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया AI' मिशनला मंजुरी दिली. 'इंडिया AI मिशन' सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीद्वारे AI या उपक्रमाला प्रोत्साहन देणार असल्याच पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
यापूर्वीही गेट्स यांनी केलं होतं भारताचं कौतुक : यापूर्वीही एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी भारतात AI वर होत असलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. गेट्स म्हणाले होते, 'AI वर या देशात आश्चर्यकारक काम सुरू आहे. तुमच्याकडे आयआयटी ही अतिशय अत्याधुनिक आहे. भारतात AI च्या क्षेत्रात खूप मोठं नेतृत्व असेल. ते नेतृत्व आरोग्य आणि कृषी सारख्या क्षेत्रात गरीबांना मदत करेल. तेव्हा आमच्या फाउंडेशनला त्याला आकार देण्यात आणि समर्थन करण्यात अभिमान वाटेल."
हेही वाचा :