ETV Bharat / bharat

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ 7 महिला मंत्र्यांचा समावेश - PM Modi New cabinet

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 9:14 PM IST

Updated : Jun 9, 2024, 10:14 PM IST

PM Modi New cabinet : रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याशिवय निर्मला सीतारामन, अनुप्रिया पटेल, शोभा करंदलाजे, अन्नपूर्णा देवी, निमुबेन बंभनिया, सावित्री ठाकूर या महिला खासदारांना देखील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

Nirmala Sitharaman, Raksha Khadse
निर्माला सीतारामन, रक्षा खडसे (ETV BHARAT Maharashtra Desk)

नवी दिल्ली PM Modi New cabinet : देशात आज नवीन सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आज अनेक मत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकार 3.0 मध्ये अनेक महिला खासदारांचाही समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एका खासदारांचा समावेश आहे. यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. यावेळी पीएम मोदींच्या टीममध्ये निर्मला सीतारामन, अनुप्रिया पटेल यांना पुन्हा संधी मिळली आहे. तसंच मोदी सरकारमध्ये अनेक नवीन महिला मंत्र्यांनाही संधी देण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन : निर्मला सीतारामन यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. सीतारामन सध्या अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. मनमोहन सिंग यांच्यानंतर त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांनी अर्थमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय.

अनुप्रिया पटेल : अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांना पुन्हा मोदी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. मागील कार्यकाळात त्यांच्याकडं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा कारभार होता. यावेळी त्यांना कोणतं खात मिळतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं यावेळी अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल यांना तिकीट दिलं होतं. अनुप्रिया पटेल यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार रमेश चंद बिंद यांचा 37 हजार 810 मतांनी पराभव केला आहे. पटेल एनडीएच्या उमेदवार म्हणून सलग तिसऱ्यांदा येथून विजयी झाल्या आहेत. याआधी 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी येथून निवडणूक जिंकली होती.

शोभा करंदलाजे : बेंगळुरू उत्तरच्या खासदार शोभा करंदलाजे यांना पुन्हा मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळतेय. यापूर्वीही त्या मंत्री होत्या.

अन्नपूर्णा देवी : झारखंडच्या कोडरमा मतदारसंघाच्या खासदार अन्नपूर्णा देवी यांना पुन्हा मोदी सरकारमध्ये मंत्री केलं जाऊ शकतं. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांच्या बैठकीत त्या उपस्थित होत्या.

रक्षा खडसे : महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांना मोदी सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या संभाव्य मंत्र्यांच्या बैठकीत रक्षा यांची देखील उपस्थित होती.

सावित्री ठाकूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मध्य प्रदेशातील धार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सावित्री ठाकूर यांनी शपथ घेतलीय. धार लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आदिवासी नेत्या म्हणून त्यांनी ओळख आहे.

निमुबेन बंभनिया : गुजरातच्या भावनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार निमुबेन बंभनिया मोदी सरकार 3.0 मध्ये मंत्री होणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. नरेंद्र मोदींची हॅट्रिक; चहा विक्रेता ते तीनवेळा पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास वाचा एका क्लिकवर - Narendra Modi PM Oath Ceremony
  2. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'हे' सहा शिलेदार, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द - Narendra Modi Oath Ceremony
  3. 'गडकरी ते रोडकरी'; भाजपाचा पोस्टरबॉय ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या थक्क करणारा राजकीय प्रवास - Nitin Gadkari Political journey

Last Updated : Jun 9, 2024, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.