ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, 71 नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश, वाचा संपूर्ण लिस्ट - Narendra Modi Takes Oath as PM

Narendra Modi Takes Oath Third Term as PM : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबत कॅबिनेट मंत्र्यांनीही रविवारी (9 जून) पद व गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या सर्वांना शपथ दिली.

Narendra Modi took oath
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा (ETV BHARAT Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 7:27 PM IST

Updated : Jun 9, 2024, 10:47 PM IST

नवी दिल्ली Narendra Modi Takes Oath Third Term as PM : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत 60 हून अधिक मंत्र्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता या शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी एनडीएच्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात महत्त्व देण्यात आलं आहे.

राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ : खासदार राजनाथ सिंह यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 2014 पासून ते पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्याकडं संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी होती. राजनाथ सिंह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार रविदास मेहरोत्रा ​​यांचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा लखनऊचे खासदार होण्याचा मान मिळाला.

नितीन गडकरी : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत गडकरी नागपूर मतदारसंघातून विजयी झाले. गडकरी हे मोदी सरकार 2.0 मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री होते. गडकरी यांना रोडकरी नावानंही संबोधलं जातं.

अमित शाह : अमित शहा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून शपथ दिली. शाह हे मोदी सरकार 2.0 मध्ये केंद्रीय गृहमंत्री होते.

एस जयशंकर : भाजपा नेते एस जयशंकर यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांच्याकडं विदेशमंत्री पदाची जबाबदारी होती. एस जयशंकर हे नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते आहेत.

एचडी कुमारस्वामी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही रविवारी एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या दोन JD(S) उमेदवारांपैकी ते एक आहेत. कुमारस्वामी मंड्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

जीतन राम मांझी : हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (धर्मनिरपेक्ष) संस्थापक जीतन राम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

सर्बानंद सोनोवाल : भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्बानंद सोनोवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आसामचे माजी मुख्यमंत्री या लोकसभा निवडणुकीत दिब्रुगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

जेपी नड्डा : भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 2019 पासून भाजपा अध्यक्षपदी कार्यरत असलेले नड्डा भाजपाच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. याआधी ते 2014-19 या काळात भाजपा सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री होते.

अश्विनी वैष्णव यांनी घेतली शपथ : भाजपा नेते अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या टर्ममध्ये अश्विनी वैष्णव यांच्याकडं रेल्वे मंत्रालय होतं.

गिरीराज सिंह : भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमधील बेगुसरायमधून गिरीराज सिंह यांनी निवडणूक जिंकली आहे. बेगुसराय जागेवर गिरीराज सिंह यांनी हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी गिरीराज सिंह यांनी 81 हजार 480 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सीपीआयचे उमेदवार अवधेश कुमार रॉय यांचा पराभव केला.

शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून घेतली शपथ : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे चार वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 65 वर्षीय चौहान यांना शपथ दिली. त्यांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

'या' मंत्र्यांनी घेतली शपथ : आतापर्यंत मोदी सरकार 3.0 मध्ये रविवारी भाजपा नेते गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेत्या अन्नपूर्णा देवी, भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, प्रल्हाद जोशी, भाजपा नेते डॉ. वीरेंद्र कुमार, JDU नेते राजीव रंजन (लालन) सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

किरेन रिजिजू : मोदी सरकार 3.0 मध्ये, किरेन रिजिजू यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. किरेन रिजिजू अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम मतदारसंघातून खासदार आहेत. ते 2014 पासून मोदी मंत्रिमंडळात आहेत.

मनसुख मांडविया, हरदीप सिंग पुरींनी घेतली शपथ : भाजपा नेते हरदीप सिंग पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याशिवाय भूपेंद्र यादव, भाजपा नेते जी किशन रेड्डी, चिराग पासवान यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली.

पीयूष गोयल पहिल्यांदाच बनले लोकसभेचे सदस्य : रविवारी पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारे गोयल 2014 तसंच 2019 मध्ये केंद्रीय मंत्री होते. 60 वर्षीय गोयल यांनी रविवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित एका भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात गोयल यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोदींचं नवं मंत्रिमंडळ :

1) नरेंद्र मोदी, पंतप्रधान
2) राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
3) अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
4) नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप,महाराष्ट्र)
5) जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
6) शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
7) निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप)
8) एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
9) मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
10) एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल)

11) पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
12) धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
13) जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा)
14) राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त)
15) सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप)
16) वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप)
17) राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी)
18) प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप)
19) जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप)
20) गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)

20) अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
22) ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप)
23) भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
24) गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री
25) अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
26) किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप)

27) हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
28) मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप)
29) जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप)

30) चिराग पासवान,कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी)

31) सी.आर. पाटील,राज्य मंत्री (भाजप)
32) राव इंद्रजित सिंह, राज्य मंत्री (भाजप)
33) डॉ. जितेंद्र सिंह, राज्य मंत्री (भाजप)
34) अर्जुन राम मेघवाल, राज्य मंत्री (भाजप)
35) प्रतापराव जाधव, राज्य मंत्री (शिवसेना,महाराष्ट्र)
36) जयंत चौधरी, राज्य मंत्री (राष्ट्रीय लोकदल)
67) जितीन प्रसाद, राज्य मंत्री (भाजप)
38) श्रीपाद नाईक, राज्य मंत्री (भाजप)
39) पंकज चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
40) कृष्णपाल, राज्य मंत्री (भाजप)

14) रामदास आठवले, राज्य मंत्री (रिपाई, महाराष्ट्र)
42) रामनाथ ठाकूर, राज्य मंत्री (डेडीयू)
43) नित्यानंद राय, राज्य मंत्री (भाजप)
44) अनुप्रिया पटेल, राज्य मंत्री (अपना दल)
45) व्ही.सोमण्णा, राज्य मंत्री (भाजप)
45) चंद्रशेखर पेम्मासानी, राज्य मंत्री (टीडीपी)
47) एसपी सिंह बघेल, राज्य मंत्री (भाजप)
48) शोभा करंदलाजे, राज्य मंत्री (भाजप)
49) किर्तीवर्धन सिंह, राज्य मंत्री (भाजप)

50) बी.एल. वर्मा, राज्य मंत्री (भाजप)

51) शंतनू ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
52) सुरेश गोपी, राज्य मंत्री (भाजप)
53) एल. मुरुगन, राज्य मंत्री (भाजप)
54) अजय टामटा, राज्य मंत्री (भाजप)
55) बंडी संजय, राज्य मंत्री (भाजप)
56) कमलेश पासवान, राज्य मंत्री (भाजप)
57) भगीरथ चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
58) सतीशचंद्र दुबे, राज्य मंत्री (भाजप)
59) संजय सेठ, राज्य मंत्री, (भाजप)
60) रवनीत सिंग बिट्टू, राज्य मंत्री (भाजप)

61) दुर्गादास उईके, राज्य मंत्री (भाजप)

62) रक्षा खडसे, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
63) सुकांता मुजूमदार, राज्य मंत्री (भाजप)
64) सावित्री ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
65) तोखन साहू, राज्य मंत्री (भाजप)
66) राजभूषण चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
67) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
68) हर्ष मल्होत्रा, राज्य मंत्री (भाजप)
69) मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
70) जॉर्ज कुरीयन, राज्य मंत्री (भाजप)
71) पवित्र मार्गेरिटा, राज्य मंत्री (भाजप)

जगभरातील प्रमुख नेते उपस्थित : बिहारमधून लालन सिंह, चिराग पासवान, जीतन राम मांझी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी पाकिस्तान वगळता 7 दक्षिण आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. नरेंद्र मोदींची हॅट्रिक; चहा विक्रेता ते तीनवेळा पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास वाचा एका क्लिकवर
  2. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'हे' सहा शिलेदार, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द
  3. 'गडकरी ते रोडकरी'; भाजपाचा पोस्टरबॉय ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या थक्क करणारा राजकीय प्रवास

Last Updated : Jun 9, 2024, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.