ETV Bharat / bharat

ओबीसी बांधव आक्रमक; जालन्यात केला रास्तारोको - Maharashtra breaking news

Maharashtra breaking news
Maharashtra breaking news (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 7:09 AM IST

Updated : Jun 18, 2024, 7:35 PM IST

Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra

LIVE FEED

7:35 PM, 18 Jun 2024 (IST)

ओबीसी बांधव आक्रमक

सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यासह संपूर्ण देशात जालना जिल्ह्याचे नाव गाजत आहे. अगोदर याच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली तर आता याच गावातून पुन्हा ओबीसी आरक्षणाची ठिणगी पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी मागील सहा दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळं ओबीसी बांधव आक्रमक होत धुळे- सोलापूर महामार्गावर अचानक रास्ता रोको केलाय. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली.

5:13 PM, 18 Jun 2024 (IST)

वसई घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश - देवेंद्र फडणवीस

वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयातसुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

4:13 PM, 18 Jun 2024 (IST)

नाना पटोले यांची पत्रकार परिषद

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले

तरुणांच्या भवितव्याशी सरकारचा पुन्हा खेळ; पोलीस भरतीची शारिरीक परिक्षा पावसाळ्यात घेऊ नका, सरकारने फेरविचार करावा.

बोगस बियाणे व खतांचा राज्यात सुळसुळात, शेतकऱ्यांची फसवणूक व लूट, पण सरकारकडून मात्र दुर्लक्ष.

काँग्रेसच्या यशामुळे घाबरलेल्या विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न.

2:09 PM, 18 Jun 2024 (IST)

वसईत प्रियकरानं भररस्त्यात प्रेयसीची केली निर्घृणपणे हत्या

वसईत प्रियकरानं भर रस्त्यात प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून हत्या केली आहे. हत्या करताना बघ्याची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती. पण कोणीही तिला सोडविले नसल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पोलीस तपास करीत आहेत.

1:28 PM, 18 Jun 2024 (IST)

अलका याज्ञिक यांना कानाचा झाला दुर्मिळ आजार, श्रवणशक्तीवर झाला परिणाम

ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना दोन्ही कानांनी ऐकू येण बंद झालं आहे. हे एका दुर्मिळ आजारामुळे झाल्याचं त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून सांगितलं. हा आजार बरा होईल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. अलका याज्ञिक यांच्या आजारावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांचा आजार बरा व्हावा, अशी चाहते प्रार्थना करत आहेत.

12:36 PM, 18 Jun 2024 (IST)

शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा इंडिया आघाडीचा आरोप, सेबीकडं चौकशीची आज करणार मागणी

एक्झिट पोलदरम्यान शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला. त्याबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत तृणमुल पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष आणि साकेत गोखले हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते.

12:12 PM, 18 Jun 2024 (IST)

पंकजा आणि धनंजय मुंडेंनी घेतली लक्ष्मण हाके यांची भेट, सरकारकडं केली 'ही' मागणी

मुंबई- आज अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. हाके यांची तब्येत खालावत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे आम्हाला पहिले सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

11:55 AM, 18 Jun 2024 (IST)

नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात बिहारमधील 9 विद्यार्थ्यांची दोन दिवस होणार चौकशी

पाटणा- बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटनं मंगळवारी नीट ( NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून पालकांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी पाटणा पोलिसांनी 11 विद्यार्थ्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.

10:53 AM, 18 Jun 2024 (IST)

मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम, निर्देशांकानं ओलांडला 77 हजारांचा टप्पा

मुंबई- मुंबई शेअर बाजारानं निर्देशांकानं विक्रमी टप्पा गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 226 अंकांनी वधारून 77,219 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 77 अंकांनी वधारून 23,543 वर पोहोचला.

10:47 AM, 18 Jun 2024 (IST)

पोलीस भरतीमधील १७,४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज, महाराष्ट्रात उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही-रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करणारी पोस्ट एक्स मीडियावर केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, पोलीस भरतीसाठी १७,४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज म्हणजेच एका जागेसाठी तब्बल १०१ अर्ज आलेले आहेत. यामध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० % हून अधिक आहे. डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केला. चांगले उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही, ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील ही अपेक्षा!

10:30 AM, 18 Jun 2024 (IST)

राहुल गांधी वायनाड लोकसभेची जागा सोडणार, लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठविलं पत्र

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे रायबरेलीसह वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकून आले आहेत. त्यांनी आता वायनाड ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठविलं आहे.

10:09 AM, 18 Jun 2024 (IST)

आमची शिवसेना म्हणणाऱ्या शिंदेंनी स्वत:ला आरशात पाहावे-संजय राऊत

मुंबई- सीबीआय, ईडी आणि सीआयडीच्या भीतीनं रविंद्र वायकर हे शिवसेना ठाकरे गटातून पळाले. रविंद्र वायकर हरले पाहून त्यांनी विजय चोरला. पैशाच्या जोरावर ते निवडणूक जिंकले. बाळासाहेबांनी शिवसेनेचा पाया रचला. पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. आम्ही पक्षासोबत इमान कायम राखले. आमची शिवसेना म्हणणाऱ्या शिंदेंनी (मुख्यमंत्री) स्वत:ला आरशात पाहावे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

9:00 AM, 18 Jun 2024 (IST)

मुंबईतील अनधिकृत चायनीज गाड्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आजपासून मोठी कारवाई होणार

मुंबई -बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने रस्त्यांवरील अनधिकृत चायनीज फूड स्टॉल्स आणि इतर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

8:52 AM, 18 Jun 2024 (IST)

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी आज प्रथमच वाराणसीच्या दौऱ्यावर

वाराणसी- लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच वाराणसीच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी हे किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत. एका कार्यक्रमादरम्यान बचत गटांच्या (SHGs) 30 हजारांहून अधिक महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रेही वितरित करण्यात येणार आहेत.

8:03 AM, 18 Jun 2024 (IST)

निखिल गुप्ता फेडर कोर्टात हजर, पन्नूनच्या हत्येच्या कटात सहभाग नसल्याचा दावा

न्यूयॉर्क- भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर अमेरिकेतील खलिस्तानी नेता पन्नूनच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्याला सोमवारी न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी गुप्तानं खलिस्तानी कटात सहभाग असल्याचा दावा फेटाळला. गुप्ता यांचे वकील जेफ्री चाब्रो यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, " ही भारत आणि अमेरिकेसाठी गुंतागुंतीची बाब आहे. गुप्ता हा शाकाहारी असल्यानं तुरुंगात शाकाहारी जेवण देण्यात यावे, असे कोर्टानं निर्देश दिले आहेत." स्वतंत्र खलिस्तानसाठी प्रचार करणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूनला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले. त्यानं सातत्यानं भारतविरोधी कारवाया करून संसदेवर हल्ला करण्याचीदेखील धमकी दिली होती.

7:54 AM, 18 Jun 2024 (IST)

मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहिल, असा हवामान विभागानं अंदाज वर्तविला आहे. हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला.

7:50 AM, 18 Jun 2024 (IST)

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठकांचं सत्र, मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांबरोबर घेतली बैठक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अपयश आल्यानंतर राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मध्यरात्री बैठकांच सत्र सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे दीड तास बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण, आगामी विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली समीकरणे पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप कसे होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Last Updated : Jun 18, 2024, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.