चंदीगड Youth in captivity for 18 years : पंचकुलातील एका तरुणानं आपल्या आयुष्यातील तब्बल 17 ते 18 वर्षे कोणतीही चूक नसताना बेड्यांमध्ये घालवली आहेत. तब्बल 17-18 वर्षांनंतर एक ट्रकचालक या तरुणासाठी देवदूत ठरला. ट्रकचालकाला तरुणाची खरी कहाणी कळताच त्यानं या तरुणाला आपल्या ट्रकमध्ये बसवून राजस्थानहून पंचकुला येथे आणलं. त्यानंतर ट्रक चालकानं तरुणाला पंचकुला पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी पाठवलं. तरुणानं पोलीस ठाण्याचे प्रभारी रुपेश चौधरी यांची भेट घेतली. सध्या या तरुणाच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
18 वर्षांपासून कैदेत : तरुणानं सांगितलं की, 17-18 वर्षांपूर्वी जगदीश नावाच्या व्यक्तीनं त्याचं अपहरण करून त्याला राजस्थानला नेण्यात आलं. तेथे त्या तरुणाला मेंढ्या-बकऱ्या चरण्याचं काम देण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभर त्याच्याकडून काम करुन घेतल्यानंतर रोज रात्री त्याला पुन्हा मेंढ्याप्रमाणे साखळदंडानं बांधून ठेवण्यात येत असे. इतकच नाही तर त्याला अमानुष वागणूक देण्यात आली. राजस्थानमध्ये शेळ्या-मेंढ्या सोडण्यासाठी गेलेल्या ट्रकचालकाला हा तरुण दिसला. तेव्हा तरुणाची ही अवस्था समोर आली.
ट्रकचालक बनला मसीहा : या तरुणाला साखळदंडात बांधलेलं पाहिलं. यानंतर ट्रक चालकानं त्या तरुणाला विचारणा केली असता त्यानं ट्रकचालकाला आपली कहाणी सांगितली. त्यानंतर ट्रक चालकानं त्याला मदत करून कैदेतून मुक्त केलं. त्याला ट्रकमध्ये बसवून राजस्थानहून पंचकुला येथे आणलं. चालकानं तरुणाला पंचकुला पोलिसांची मदत घेण्यास सांगितलं. ट्रक चालकानं तरुणाच्या हातात एक चिठ्ठीदेखील दिली. यात तो पंचकुला येथील आहे, असं लिहिण्यात आलं होतं. परंतु तरुणाला अद्यापही आपल्या गावाचं आणि पालकांचं नाव माहित झालेलं नाही.
कुटुंबाशी भेट करुन देण्याचा प्रयत्न : तरुणाचं अपहरण करण्यात आलं, त्यावेळी तो केवळ 11 वर्षांचा होता. आज त्याला कुटुंबातील कुणीही आठवत नाही. त्याला त्याच्या गावाचं किंवा शहराचं नावदेखील माहित नाही. या तरुणाचे कुटुंबिय शोधण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पंचकुला सेक्टर-5 पोलीस ठाण्याचे प्रभारी रूपेश यांनी सांगितलं की, " एका ट्रक चालकानं या तरुणाला राष्ट्रीय महामार्गावर सोडलां. मीडिया मदत करेल आणि पोलीस तुला घरी घेऊन जातील," असं त्यानं तरुणाला सांगितलं. त्याचबरोबर या तरुणाला कोणी ओळखत असल्यास सेक्टर 5 पोलीस ठाण्यात संपर्क साधावा," असं आवाहनही पोलीस स्टेशन प्रभारी रुपेश यांनी केलंय.
हेही वाचा -
- मैत्रिणीचं अपहरण करत मागितली खंडणी, पैसे मिळाल्यानंतरही खून करणाऱ्या तिघांना अटक - Pune Murder News
- चिमुरड्याचं अपहरण, खंडणी अन् निर्घृण हत्या; मोबाईल लोकेशनमुळं आरोपी सापडले, दोन भावांना अटक - Boy Killed For Ransom
- पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदू मुलीचं अपहरण, संपूर्ण देशात आंदोलन करण्याचा हिंदू समुदायाचा इशारा - hindu girl abducted in pakistan