रांची Jharkhand News CM : झारखंडमध्ये नवीन सरकार स्थापन कधी होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी सांयकाळी पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांना 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. राज्यपालांकडून सरकार स्थापनेबाबत काहीही अधिकृत माहिती आलेली नाहीय. नवं सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पक्षाकडून 43 आमदारांचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले, सुमारे 22 तास उलटले आहेत. परंतु नवीन सरकारच्या शपथविधीबाबत राज्यपालांनी काहीही सांगितलेलं नाही.
43 आमदारांचा पाठिंबा : महाआघाडी विधिमंडळ पक्षाच्या नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना पत्र लिहून दुपारी ३ वाजता राजभवनात भेटीची वेळ मागितली होती. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सायंकाळी साडेपाच वाजता बैठकीची वेळ दिली आहे. मात्र, त्यांनी केवळ 5 नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. सोरेन यांनी बहुमताची हमी देण्यासाठी आमदारांना भेटण्यासाठी वेळ मागितली. राज्यात तब्बल 18 तास सरकार नसल्यानं गोंधळाची परिस्थिती आहे. आम्हाला 43 आमदारांचा पाठिंबा असून स्वाक्षऱ्यांचं पत्रं सादर राज्यपालांना पाठवल्याचं सोरेन यांनी सांगितलं.
'सध्या राज्यात गेल्या 22 तासांपासून सरकार अस्तित्वात नाही. त्यामुळं राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे. संवैधानिक प्रमुख या नात्यानं आम्ही सर्व आमदार, राज्यातील जनतेची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला लवकरच लोकप्रिय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करून राज्याला गोंधळातून बाहेर काढाव.'- चंपाई सोरेन
आमदारांना हैदराबादला हलवण्याची तयारी : एकीकडं चंपाई सोरेन यांनी आमदारांची परेड काढून त्यांना सरकार स्थापनेची संधी देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडं आमदारांना हैदराबादला हलवण्याची तयारीही सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचं पथक हैदराबादला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे जमीन घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी बुधवारी अटक होण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सोरेन यांच्या राजीनाम्यापूर्वी चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्यापदी निवड करण्यात आली होती. बुधवारी रात्रीच त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता.
हे वाचलंत का :