रांची Champai Soren letter on X : माजी मुख्यमंत्री आणि सध्या हेमंत मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या चंपाई सोरेन यांचा पक्षात झालेल्या अपमानामुळं संतप्त झालेल्या चंपाई सोरेन यांनी अखेर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
चंपाई सोरेन हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दिल्लीला पोहोचताच त्यांनी एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. "मला सत्तेचा लोभ नव्हता. पण स्वाभिमानाची ही जखम मी कोणाला दाखवू? माझ्या प्रियजनांनी दिलेल्या वेदना मी कुठं व्यक्त करू? मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. अपमानास्पद वागणूक पाहून मी भावनिक झालो. पण त्यांचा फक्त खुर्चीशी संबंध होता. त्या पक्षात माझं अस्तित्वच नसल्यासारखं वाटत होतं. त्या दिवसापासून आजपर्यंत आणि आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत या प्रवासात माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत", असं सोरेन म्हणालेत.
जोहार साथियों,
— Champai Soren (@ChampaiSoren) August 18, 2024
आज समाचार देखने के बाद, आप सभी के मन में कई सवाल उमड़ रहे होंगे। आखिर ऐसा क्या हुआ, जिसने कोल्हान के एक छोटे से गांव में रहने वाले एक गरीब किसान के बेटे को इस मोड़ पर लाकर खड़ा कर दिया।
अपने सार्वजनिक जीवन की शुरुआत में औद्योगिक घरानों के खिलाफ मजदूरों की आवाज…
चंपाई सोरेन यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? : ते म्हणाले की, "होळीच्या दुसऱ्या दिवशी, माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वानं पुढं ढकलले असल्याचं मला समजलं. यामध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम दुमका येथे होता. तर दुसरा कार्यक्रम पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. असं का करण्यात आलं? हे विचारलं असता युतीनं 3 जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असं मला सांगण्यात आलं. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्यानं रद्द करून घेण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकतं का? अपमानाचा हा कडू घोट पिऊनही मी सांगितलं की, नियुक्तीपत्रांचे वाटप सकाळी आहे. तर दुपारी विधीमंडळ पक्षाची बैठक आहे. त्यामुळं मी तिथं जाऊन उपस्थित राहीन. परंतु, त्यासाठी साफ नकार देण्यात आला."
माझ्यापुढे तीन पर्याय- पुढे चंपाई यांनी म्हटले, "विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, मला बैठकीचा अजेंडाही सांगण्यात आला नव्हता. मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण, गेल्या तीन दिवसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळं मी भावूक झालो होतो. पण त्यांना फक्त खुर्चीची चिंता होती. ज्या पक्षासाठी आपण आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या पक्षात माझं अस्तित्वच नाही, असं मला वाटलं. विधिमंडळ पक्षाच्या त्याच बैठकीत मी जड अंत:करणानं म्हणालो की, 'आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे.' यात माझ्याकडं तीन पर्याय होते. पहिला म्हणजे राजकारणातून निवृत्ती, दुसरा म्हणजे स्वतःची संघटना उभी करणं आणि तिसरा म्हणजे या वाटेवर कोणी सोबती दिसला तर त्याच्यासोबत पुढचा प्रवास करणे."
हेही वाचा -
- झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ; फक्त १५३ दिवसात मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, कारण काय? - CM Champai Soren Resigned
- जुमलेबाजीच्या विरोधात देशात 'इंडिया' आघाडीचा येणार झंझावात, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा विश्वास - CM Champai Soren Interview
- चंपाई सोरेन सरकारने झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला