ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर 'इंडिया आघाडी'ची निदर्शनं; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित - INDIA Alliance Protest - INDIA ALLIANCE PROTEST

INDIA Alliance Protest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात 'इंडिया' आघाडी 31 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर निदर्शनं करणार आहे. या कार्यक्रमाला प्रशासनानं परवानगी दिलीय. या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

India Aghadi protest
India Aghadi protest
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 9:25 PM IST

नवी दिल्ली INDIA Alliance Protest : दिल्लीतील रामलीला मैदानावर ३१ मार्च रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या निदर्शनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळाली. रामलीला मैदानावर २० हजार लोकांना उपस्थित राण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आलीय. इंडिया आघाडीच्या बॅनरखाली ही निदर्शनं करण्यात येणार आहेत.

हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा : इंडिया आघाडीच्या संयुक्त निदर्शनात 'हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा' असा नारा देण्यात येणार आहे. यामध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचा समावेश असणार आहे. यावेळी फक्त इंडिया आघाडीचं बॅनर लावण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी (आप) या निदर्शनाची तयारी करत आहे. आम आदमी पार्टीचे नेते, कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेचा पाठिंबा मिळवत आहेत.

इंडिया आघाडीचे नेते होणार सहभागी : या आंदोलनात देशातील इंडिया आघाडीचे मोठे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, डेरेक ओब्रायन, त्रिची शिवा, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, डी राजा, दीपंकर आदी नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या मेगा रॅलीमध्ये भट्टाचार्य, जी देवराजन तसंच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील सहभागी होणार आहेत.

विरोधकांचा भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा : खरंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपासून विरोधक सातत्यानं भाजपा सरकारचा निषेध करत आहेत. यासोबतच इलेक्ट्रोल बाँडच्या मुद्द्यावरही विरोधकांच्या अनेक बैठका सुरू आहेत. त्यामुळं विरोधकांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा' असा नारा देण्यात येणार आहे.

हे वाचलंत का :

  1. "संजय राऊतांमुळंच आघाडीत बिघाडी"; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - prakash ambedkar
  2. खासदार श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार, शरद पवारांनी निवडणूक लढवण्याची मागणी - Lok Sabha elections
  3. ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाची कॉंग्रेसला नोटीस; ठोठावला 1700 कोटींचा दंड - Income Tax Notice Congress

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.