नवी दिल्ली Google Doodle : देशात आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलनंही खास डूडल बनवलंय. यात एक रंगीत आणि एक ब्लॅक अँड व्हाइट अशा अनेक स्क्रीन दाखवल्या आहेत. गुगलनं आधी दोन टीव्ही आणि नंतर एक मोबाईल दाखवलाय. हे डूडल वृंदा जावेरी यांनी बनवलंय.
गेल्या वर्षीही बनवलं होतं डूडल : गेल्या वर्षी गुजरातमधील कलाकार पार्थ कोठेकर यांनी भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं डूडल तयार केलं होतं. यात त्यांनी हातानं कापलेली एक गुंतागुंतीची कलाकृती तयार केली होती. राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या मार्चिंग तुकडी आणि मोटरसायकलस्वारांसह प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील अनेक घटक कलाकृतीमध्ये जोडले गेले होते.
-
Google celebrates India's 75th Republic Day with Doodle featuring parade on different screens over decades
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/UkoidJqlLh#Google #RepublicDay #75RepublicDay #doodle #GoogleDoodle pic.twitter.com/N3cA1cnN4s
">Google celebrates India's 75th Republic Day with Doodle featuring parade on different screens over decades
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2024
Read @ANI Story | https://t.co/UkoidJqlLh#Google #RepublicDay #75RepublicDay #doodle #GoogleDoodle pic.twitter.com/N3cA1cnN4sGoogle celebrates India's 75th Republic Day with Doodle featuring parade on different screens over decades
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2024
Read @ANI Story | https://t.co/UkoidJqlLh#Google #RepublicDay #75RepublicDay #doodle #GoogleDoodle pic.twitter.com/N3cA1cnN4s
1950 मध्ये या दिवशी भारतानं स्वीकारलं संविधान : भारतानं 1950 मध्ये आजच्याच दिवशी संविधान स्वीकारलं. स्वतःला एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केलं. भारताला 1947 मध्ये ब्रिटीश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर लगेचच राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सभेला गव्हर्निंग दस्तऐवजावर चर्चा, सुधारणा आणि मंजूरी देण्यासाठी दोन वर्षे लागली. घटना स्वीकारल्यानंतर भारत हा सर्वात मोठा संविधान असलेला देश बनला.
- संविधानानेच मोकळा केला लोकशाहीचा मार्ग : या दस्तऐवजाचा (संविधान) स्वीकार केल्यानं लोकशाहीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय नागरिकांना स्वतःचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला. 26 जानेवारी ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली. या दिवशी दिल्लीसह देशभरात परेड होतात. यातील सर्वात मोठी परेड नवी दिल्लीतील मार्गावर होते.
हेही वाचा :
- अमृतकाळात देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून विशेष संदेश
- 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी का निवडला गेला? का लागू झाली भारतीय राज्यघटना ?
- माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर, पंतप्रधानांनी केले अभिनंदन